NGN News
Latest Marathi News

‘रमी’चा डाव उलटला.. माणिकरावांचे ‘कृषी’ गेले, ‘क्रीडा’ आले

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क

विधिमंडळात रमी खेळणे माणिकराव कोकाटे यांच्या अंगलट आले आहे. कोकाटे यांची कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात येवून त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आला आहे. दत्तात्रय भरणे आता नवे कृषिमंत्री असणार आहेत.

माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचे खाते बदलत त्यांची खुर्ची वाचवली. क्रीडा आणि युवक खाते मिळाल्याने अजितदादांचे विश्वासू असलेलेल दत्तात्रय भरणे हे नाराज असल्याची चर्चा होती. दत्तात्रय भरणेंनी खातेवाटपानंतर ही नाराजी उघडही केली होती. मात्र आता कोकाटेंवरील कारवाई ही दत्तात्रय भरणेंसाठी इष्टापत्ती ठरली आहे.

Comments are closed.