NGN News
Latest Marathi News

कामासंदर्भात लाच मागितल्यास तत्काळ संपर्क साधा

  • सीबीआय लाचलुचपत तर्फे ‘आयमा’ संलग्न उद्योजकांसाठी जनजागृती मोहीम

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

केंद्रीय आस्थापना,राष्ट्रीयकृत बँक व सार्वजनिक उपक्रमाचे अधिकारी व कर्मचारी नाशकातील उद्योजकांकडून कोणत्याही कामासंदर्भात लाचेची मागणी करीत असतील तर उद्योजकांनी तातडीने सीबीआयच्या पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन या खात्याच्या निरीक्षक  शीतल पाटील यांनी आयमा सभागृहात आयोजित केले.

      सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने हाती घेतलेल्या जनजागृती मोहिमेतर्गत नाशिकला भेट देऊन उद्योजकांशी संपर्क साधला. व्यासपीठावर ‘आयमा’चे अध्यक्ष ललित बूब, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, करण सिंग पाटील, दिलीप वाघ, सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन शर्मा आदी उपस्थित होते.

     याप्रसंगी माजी अध्यक्ष जे.आर.वाघ,कुंदन डरंगे, जयंत पगार,राहुल गांगुर्डे, चंद्रशेखर सिंग,जगदीश पाटील,अविनाश बोडके, नितीन आव्हाड,राजेंद्र कोठावदे, कमलेश उशीर,योगेश पाटील, नानासाहेब देवरे आदींनी विविध प्रश्न उपस्थित केले. शीतल पाटील यांनी त्याची समर्पक उत्तरे दिली. करणसिंग पाटील यांनी आभार मानले.कार्यक्रमास उद्योजक तसेच विविध कंपन्यांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

———————————

@ केंद्रीय आस्थापनांकडून काही त्रास होत असेल आणि कुणी अधिकारी लाचेची मागणी करत असेल तर सरळ आमच्याशी निसंकोचपणणे आमच्याशी संपर्क साधा.आम्ही तक्रारीची पडताळणी करून संबंधित व्यक्तीविरुद्ध  कारवाई करू शकतो. तक्रारदाराने पुढे येऊन तक्रार दिली पाहिजे.

  • शीतल पाटील, निरीक्षक, सीबीआय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे

Comments are closed.