नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या पुस्तक मित्र मंडळमध्ये डॉ. अतुल गवांदे लिखित बीइंग मॉर्टल या पुस्तकावर सौ. शामल योगेंद्र पाटील यांनी वृद्धाश्रम ही सोय नाही, तर ती सामाजिक अपयशाची साक्ष असल्याचे प्रतिपादन केले. असाध्य आजारांनी ग्रस्त रुग्णांना आणि वृद्धांना केवळ वैद्यकीय उपचार मिळत नाही व उपचार पुरेसे ठरत नाही, तर कुणाचा तरी मदतीचा हात आवश्यक असतो. जीवनातील अंतिम सत्य म्हणजे मृत्यू. मृत्यूला सामोरे जाण्याचे ध्येय व्यक्तीला ठेवावे लागते. मृत्यू स्वीकारण्याची सुद्धा एक मानसिक तयारी ठेवावी लागते. समाजातील व कुटुंबातील वृद्धाची सेवा करणे, आणि त्यांचे उर्वरित आयुष्य सुखा समाधानाने जगण्यासाठी त्यांना मदत करणे हे नव्या पिढीचे कर्तव्य आहे. आपण समाज म्हणुन याकडे डोळसपणे पाहिले पाहिजे असे भावपुर्ण उदगारही त्यांनी काढले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक पुस्तक मित्र मंडळ प्रमुख मंगेश मालपाठक यांनी केले. वक्त्यांचा यांचा परिचय समिती सदस्य सुहास टिपरे यांनी करून दिला. नाट्यगृह सचिव जयेश बर्वे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. लक्ष्मीकांत भट यांनी केले. या कार्यक्रमप्रसंगी डॉ. लक्ष्मीकांत भट यांनी सावानाला रु.अकरा हजाराची देणगी जाहीर केली.
यावेळी सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रा. सोमनाथ मुठाळ, देवदत्त जोशी, ज्येष्ठ वाचक सभासद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. पौर्णिमा आंबेकर व जितेंद्र आहेरराव यांनी प्रयत्न केले.
Comments are closed.