नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (“केएमएएमसी” / “कोटक म्यूचुअल फंड”) ने आज कोटक अॅक्टिव्ह मोमेन्टम फंड लॉन्च केल्याचे जाहीर केले. ही मोमेन्टम थीमचे पालन करणारी एक ओपन-एंडेड इक्विटी स्कीम आहे. हा फंड कंपनीच्या इन-हाऊस विकसित मॉडेलच्या आधारे असे शेअर्स शोधून काढतो, ज्यांच्यात अर्निंग्ज मोमेन्टम असेल म्हणजे ज्यांच्या उत्पन्नात वाढ होत असेल. ही योजना सार्वजनिक गुंतवणुकीसाठी 29 जुलै 2025 पासून ते 12 ऑगस्ट 2025 पर्यंत खुली असेल.
मोमेन्टम गुंतवणुकीत वाढत्या किंमतीच्या शेअर्सची किंमत अशीच वाढत राहील असे अनुमान करून ते स्टॉक विकत घेतले जातात. परंतु, मोमेन्टम केवळ किंमतीपर्यंत मर्यादित नाही. अर्निंग्ज मोमेन्टम अशा स्टॉक्सवर लक्ष केंद्रित करते, ज्यांच्यात उत्पन्नात सुधारणा होत असेल आणि ज्यांच्या बाबतीतील विश्लेषकांचे मत सकारात्मक असेल. कोटक अॅक्टिव्ह मोमेन्टम फंड अशा कंपन्यांना लक्ष्य बनवतो, ज्यांचे प्रती शेअर उत्पन्न (ईपीएस) वाढत असेल, मग ते विश्लेषकांकडून मिळालेल्या अपग्रेडमुळे असो किंवा अनपेक्षित चांगल्या तिमाही परिणामांमुळे असो. हा फंड कोटक म्यूचुअल फंड द्वारा विकसित विशेष मॉडेलवर आधारित आहे, जो अर्निंग्ज आणि विक्रीतील वृद्धी तसेच विश्लेषकांच्या रेटिंग्जच्या आधारे मोमेन्टमचे मूल्यांकन करतो.
कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे मॅनिजिंग डायरेक्टर निलेश शाह म्हणाले, “बाजार नेहमी अर्निंग्जच्या अधीन असतात. इतिहास साक्ष देतो की, तेजीत आणि मंदीत अर्निंग्ज किंमतींपेक्षा चांगली कामगिरी करतात. हाच आमच्या फंडचा पाया आहे. कोटक म्यूचुअल फंडमध्ये आम्ही एक असे मॉडेल तयार केले आहे, जे केवळ किंमतीच्या ट्रेंडचा नाही, तर त्याही पुढचा विचार करते.”
या फंडचा पोर्टफोलियो मार्केट कॅपच्या आधारे टॉप 250 शेअर्समधून निवडण्यात आला आहे. कठोर मानके लावून कमजोर शेअर्स त्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. याचा परिणाम 40-50 उच्च गुणवत्तेच्या शेअर्सच्या एका डायव्हर्सिफाईड बास्केटच्या रूपात समोर येतो, ज्याचे नियमितपणे पुनरावलोकन करून त्यास पुनर्संतुलित करण्यात येते.
कोटक अॅक्टिव्ह मोमेन्टम फंडचे फंड मॅनेजर रोहित टंडन म्हणाले, “आम्ही गुंतवणूक धोरण आणि डेटा सायन्सची सांगड घालून एक असा फंड बनवला आहे, जो अर्निंग्ज-प्रेरित मोमेन्टम टिपू शकेल. कोटक अॅक्टिव्ह मोमेन्टम फंड एका सामान्य विश्वासावर उभारला आहे की, जेव्हा अर्निंग्ज वाढतात आणि विश्लेषक त्यांना अपग्रेड करतात, तेव्हा किंमती अखेरीस त्याच दिशेने जातात. आमचे मॉडेल शिस्त आणि डेटाच्या मदतीने हे साध्य करते. हा केवळ एक ट्रेंड-आधारित फंड नाही, तर अर्निंग्ज-प्रेरित संधी आहे.”
कोटक अॅक्टिव्ह मोमेन्टम फंड गुंतवणूकदारांना शिस्त आणि निरंतरतेसह मोमेन्टममध्ये सहभागी होण्याचे एक सशक्त माध्यम प्रदान करतो. हा फंड स्टॉक परफॉर्मन्स चालवणाऱ्या वास्तविक कारकांमध्ये गुंतवणुकीचा संशोधन-आधारित, स्पष्ट आणि ठोस मार्ग प्रदान करतो.
ही स्कीम सार्वजनिक गुंतवणुकीसाठी 29 जुलै 2025 पासून ते 12 ऑगस्ट 2025 पर्यंत खुली आहे. एनएफओ कालावधीत गुंतवणूकदार या फंडात कमीतकमी 5000 रु. आणि त्यापेक्षा जास्त कितीही रक्कम गुंतवू शकतात. एसआयपी साठी 500/- रु. (500 रु. चे कमीत कमी 10 हप्ते आवश्यक). कोटक अॅक्टिव्ह मोमेन्टम फंड बाबत अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या: (PPT LINK)
हे उत्पादन आपल्यासाठी अनुकूल आहे की नाही, याबद्दल शंका असल्यास गुंतवणूकदारांनी आपल्या आर्थिक तज्ज्ञाचा किंवा कर सल्लागाराचा सल्ला घ्यावा. कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (केएमएएमसी) कोणत्याही परतव्याची / भावी परताव्याची हमी किंवा वचन देत नाही. या स्कीमविषयी अधिक माहितीसाठी कृपया आमच्या www.kotakmf.com या वेबसाइटवरील योजना माहिती दस्तऐवज बघा.
Comments are closed.