- नविन कार्यकारिणीचा शपथविधी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीज़नस ने नविन कार्यकारिणी चा शपथविधी समारंभात आदिवासी पाड्यावर स्मशानभुमीचे निर्माण करुन केली सेवा कार्याची सुरुवात लायन्स क्लब ॲाफ नाशिक स्मार्ट सिटीजनस ह्या क्लबच्या नविन सभासदांना व नुतन अध्यक्ष व कार्यकारणीस शपथ देण्याचा व तसेच स्मार्ट सिटीजनस पुरस्काराचे वितरण असा भव्य कार्यक्रम नुकताच पार पडला.
लायन्स क्लब ॲाफ नाशिक स्मार्ट सिटीजन नविन कार्यकारणीच्या शपथग्रहण कार्यक्रमाची सुरुवात सुप्रसिध्द गायिका व लायन सारीका शिरोडे यांनी गणेशवंदनाने केली मावळते अध्यक्ष व झोन चेयरमन लायन राजेंद्र कोठावदे यांनी मागिल वर्षाच्या केलेल्या सेवा कार्याची माहिती दिली. त्या नंतर लायन्स क्लब ॲाफ नाशिक स्मार्ट सिटीजनस ह्या क्लबच्या नविन सभासदांना डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ॲाफीसर व संस्थापक अध्यक्ष लायन जयंत येवला यांनी नविन १८ सभासदांना सभासदत्वाची शपथ दिली, माजी प्रांतपाल लायन राजेंद्र मुछाल यांनी नुतन अध्यक्ष लायन योगेश नेरकर सेक्रेटरी लायन सचिन वाघमारे व खजिनदार लायन रविंद्रजी सोनजे व सर्व कार्यकारणीस शपथ दिली संस्थापक अध्यक्ष लायन जयंत येवला यांनी लायन्स क्लब ॲाफ नाशिक स्मार्ट सिटीजन च्या स्थापना करण्याचा उद्देश व सामाजिक काम कसे केली जातात यासंदर्भात माहिती दिली, सदर समारंभ प्रसंगि नुतन अध्यक्ष लायन योगेश नेरकर यांनी त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळाची जोरदार सुरवात पुढील सेवा कार्याने केली
- आदिवासी भागातुन सिव्हील हॅास्पिटल येणारया गरीब व गरजु रुग्णांना सहा वॅाकर देण्यात आलेत,
- विद्यार्थ्यांना वाचणाची आवड निर्माण करण्या साठी जिल्हा परीषद शाळेस ग्रंथ पेटी देण्यात आली,
- आदिवासी भागातुन सिव्हील हॅास्पिटल येणारया गरीब व गरजु रुग्णांस एक व्हीलचेयर देण्यात आली,
- लायन्स क्लब ॲाफ नाशिक स्मार्ट सिटीजन्स ने पर्मनंट प्रोजेक्ट अंतर्गत अतिदुर्गम अशा चौरपाडा तालुका त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी पाड्यांवर स्मशानभूमी निर्माण करण्यासाठी गुरुजी रुग्णालय संचलित सेवा संकल्प समितीला रक्कम रुपये एक लाख पन्नास हजारांचा चेक सुपर्द केला.
- नाशिक जिल्ह्या मध्ये सामाजिक क्रिडा कला व विविध क्षेत्रात कार्य करुन ज्यांच्या कार्याने नाशिक ची मान उंचावली आहे अशा व्यक्तिमत्वाच्या कार्याचा बहुमान म्हणुन लायन्स नाशिक स्मार्ट सिटीजन गौरव पुरस्कार देवुन गौरविण्यात येते ह्या वर्षी
- नाशिक गोदावरी स्वच्छता अभियान💧 मागील सलग साडेतीन वर्षांपासून स्वच्छतेच्या मार्फत आई गोदावरी नदी ची निस्वार्थीपणे अखंड सेवा. दर रविवार सकाळी 7.30 वाजता गोदाकाठ पंचवटी नाशिक येथे.. नदी पात्रातील निर्माल्य फुले हर प्लास्टिक देवी देवतांचे फोटो याचे संकलन करून स्वच्छता अभियान तब्बल 150 आठवड्यांपासून नियमित चालू आहे.. सुरुवातील केवळ सृष्टी तिचे वडील आणि लहान बहीण ह्या देव परिवारातील तीन व्यक्तींनी चालू केलेले हे अभियान आणि आज याच टीम मध्ये 200 ते 250 गोदामाई सेवक सहभागी झाले आहेत. कुमारी सृष्टी ने पर्यावरण संरक्षण या मध्ये केलेली कामगीरी ही निश्चीतच भूषणावह व अभिमानास्पद आहे.
- गेल्या अनेक वर्षांपासून मंगलरूप गोवत्स सेवा ट्रस्टच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील जखमी, बेवारस, अपघातग्रस्त आणि आजारी गोवंश तसेच इतर प्राणी-पक्ष्यांवर उपचार व संगोपनाचे कार्य अत्यंत समर्पितपणे करणारे, हे कार्य पशुवैद्यकीय देखरेखीखाली, त्यांच्या मार्गदर्शनात सुरु असून ते संस्कृतीरक्षक, पर्यावरणपूरक, धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व असलेले आहे. ह्या कार्यामुळे नाशिक जिल्ह्याचे नाव उंचावले असून, समाजाप्रती ही बांधिलकी अत्यंत प्रेरणादायी आहे. ह्या दोघांनी सामाजिक क्षेत्रात केलेली कामगीरी ही निश्चीतच भूषणावह व अभिमानास्पद आहे. या दोघ गौरव पुरस्काराच्या मानकरींनी केलेल्या कार्याने नाशिक जिल्ह्याचे नाव उज्ज्वल व उंचावले आहे. या दोघांना लायन्स क्लब नाशिक स्मार्ट सिटीजन गौरव हा मानाचा पुरस्कार माजी प्रांतपाल लायन राजेद्रजी मुछाल व माजी प्रांतपाल लायन विनोद जी कपुर यांच्या हातुन देवुन गौरविण्यात आले.
- नुतन अध्यक्ष लायन योगेश नेरकर व नविन कार्यकारणी यांनी अशा जोरदार सेवा कार्यांने धडाकेबाज सुरवात केली , कार्यक्रमाचे सुत्र संचलन लायन स्मिता राणे व माजी अध्यक्ष लायन किशोर शिरोड यांनी केले प्रमुख पाहुणे माजी प्रांतपाल लायन राजेंद्र जी मुछाल व मार्गदर्शक लायन विनोद जी कपुर, व नासिक मनमाड मालेगाव सिन्नर येथुन लायन्स पदाधिकारी उपस्थित होते ह्या कार्यक्रम यशस्वी होण्या साठी माजी अध्यक्ष व इन्टॅालींग कमिटी अध्यक्ष लायन विनोद सोनजे माजी अध्यक्ष लायन प्रमोद परसरामपुरीया, सिनियर लायन पंडित राव जी वाघ, लायन भुषण कोठावदे झोन चेयरमन लायन राजेंद्र जी कोठावदे, लायन महेश पितृभक्त, लायन प्रियंका कोठावदे, लायन रिधीमा येवला, लायन विलास लिधुरे, लायन देवेंद्र राणे. लायन मनोज बागुल लायन ऐश्वर्या बागुल लायन डॅाक्टर निलिमा जाधव यांनी परिश्रम घेतले
Comments are closed.