NGN News
Latest Marathi News

उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर

  • प्रभाग क्रमांक १५ मध्ये आयोजन
  • तब्बल ७०० स्त्री-पुरुषांनी घेतला लाभ
  • प्रथमेश गीते, विशाल पवार, सीमा पवार आणि राजेश गांगुर्डे यांचा पुढाकार

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक १५ मध्ये शिवसेनेच्या ( उबाठा ) वतीने शनिवारी ( दि. २६ ) मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा प्रभागातील तब्बल ७०० स्त्री-पुरुषांनी लाभ घेतला. सदर शिबिराचे आयोजन पक्षाचे महानगरप्रमुख प्रथमेश गीते, जेष्ठ्य कार्यकर्ते विशाल पवार आणि राजेश गांगुर्डे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते.

काठे गल्लीतील त्रिकोणी गार्डन नजीक विशाल पवार यांच्या संपर्क कार्यालयात शिबीर घेण्यात आले. माजी आमदार वसंतराव गीते यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड आदी नेत्यांनी शिबिरास भेट दिली. यावेळी सर्व नेत्यांनी शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबाबत आयोजकांचे, विशेषतः विशाल पवार आणि सीमा पवार यांचे कौतुक केले.

शिबिरार्थींच्या विविध चाचण्या मोफत..

शिबिरात इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ECG), लिपिड प्रोफाईल, HBA1C (तीन महिन्याची साखर), रक्तातील साखरेचे प्रमाण, ब्लड प्रेशर चेकअप आदि चाचण्या मोफत करण्यात आल्या. सह्याद्री हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. सुरेश पाटील यांनी शिबिरात विशेष मोफत मार्गदर्शन केले. सकाळी ९ वाजेपासून सुरु झालेल्या या शिबिराची दुपारी १ वाजेच्या दरम्यान सांगता झाली. प्रभाग क्रमांक १५ मधील अनेक स्त्री-पुरुषांनी शिबिराचा लाभ घेत आयोजकांचे धन्यवाद मानले.

या शिबीर यशस्वीतेसाठी सीमा पवार, स्वाती पाटील, दीपा म्हस्के, जाधव, प्रसाद नागवंशी, मुक्ती कांचवाला आली अजगर, ओमकार उदावंत, तोषल वाघ, निलेश करपे, सिराज चौधरी, संकेत कारखेले, राजेश काळे, दत्ता गांगुर्डे यांसह शिवसेना उबाठा पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.