NGN News
Latest Marathi News

नवीन शैक्षणिक धोरणातील बदल आत्मसात करा : ॲड. नितीन ठाकरे

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

आगामी काळामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात झालेले अमुलाग्र बदल विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत आणि भावी संधी व आव्हानांसाठी तयार रहावे, असा मोलाचा सल्ला मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी दिला. शारीरिक, मानसिक, भावनिक असा सर्वांगीण विकास म्हणजे खरे शिक्षण असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान, संगणकशास्त्र व बिव्होक आणि व्हिडीओ प्रोडक्शन शाखांमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्टुडन्ट इंडक्शन प्रोग्राम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. अध्यक्षीय मनोगतात ॲड. ठाकरे यांनी उच्च शिक्षणातील संधींची माहिती आणि जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे, विद्यार्थी विकास अधिकारी आणि स्टुडन्ट इंडक्शन प्रोग्रामचे समन्वयक डॉ. तुषार पाटील, उपप्राचार्य डॉ. एन. डी. गायकवाड, प्रा. एस. आर. शिरसाठ, डॉ. कल्पना अहिरे, डॉ. व्ही. बी. बोरस्ते, तसेच प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूण पाच दिवस आयोजित केलेल्या स्टुडन्ट इंडक्शन प्रोग्राममध्ये प्राचार्य डॉ. काळे यांनी पीपीटीद्वारे महाविद्यालयाची सखोल ओळख करून दिली. याशिवाय एनईपी, परीक्षा विभाग,आयक्यूएसी, एनएसएस, एनसीसी, विद्यार्थी विकास मंडळ, प्लेसमेंट अँड ट्रेनिंग सेल, आयआयसी सेल, कौन्सिलिंग सेल, जिमखाना विभाग यासह स्पर्धा परीक्षा केंद्र यांची माहिती विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. स्टुडन्ट इंडक्शन प्रोग्रामच्या यशस्वीतेसाठी डॉ. दीपक ढोकळे, डॉ. ज्ञानेश्वर खांडबहाले, डॉ.संदीप भामरे, प्रा. डी. डब्ल्यू. आहेर, प्रा. सागर पेखळे यांसह समितीतील सदस्यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.