
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विविध चौदा निर्णय घेण्यात आले. यामध्ये जलसंपदा, नियोजन, सामान्य प्रशासन, इतर मागास बहुजन कल्याण, मराठी भाषा, सार्वजनिक बांधकाम आणि पणन या विभागांशी निगडीत निर्णयांचा समावेश आहे. या मालिकेमध्ये नाशिक जिल्ह्यासाठी तीन निर्णयांचा समावेश आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या ‘साहित्य संस्थांना अनुदाने’ योजनेतून यापुढे दरवर्षी दहा लाख रुपयांचे अनुदान देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याशिवाय, नाशिक परिक्रमा मार्ग (रिंग रोड) प्रकल्पासाठी आवश्यक अशा जमीन खरेदीवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मान्यता देण्याचा निर्णयही एकमुखाने मान्य करण्यात आला. तिसऱ्या निर्णयानुसार, नाशिक जिल्ह्यातील अंबोली-वेळुंजे प्रवाही वळण योजना प्रकल्पासाठी ४९ कोटी २६ लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.
Comments are closed.