NGN News
Latest Marathi News

सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इयत्ता नववीतील विद्यार्थी कबीर मोठे याने जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली असून, त्याची राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तसेच विद्यार्थी सम्राट माळी याने अकोला येथे झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. त्याचीही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दोन्ही विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे संचालक डॉ. ऑगस्टिन पिंटो, संचालिका डॉ. ग्रेस पिंटो, मुख्याध्यापिका मंजू पाटील आणि विभागप्रमुख शितल चिंचोलीकर यांनी अभिनंदन केले.

या दोन्ही खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दिनेश जॉन आणि मनीष प्रजापती यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी भर पडली असून, त्यांच्या राज्यस्तरीय स्पर्धेतील कामगिरीसाठी शाळेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

Comments are closed.