NGN News
Latest Marathi News

महाप्रसाद, लंगरमधील अन्नाची गुणवत्ता रडारवर.. स्थायी आदेश, ‘झिरो टॉलरन्स’ धोरण !

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क

आगामी सण-उत्सवांच्या काळात होणारी अन्नातील भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन अर्थात ‘एफडीए’ने ‘स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स’ हा ऐतिहासिक आणि धर्मनिरपेक्ष निर्णय जाहीर केला आहे. सदर नियमानुसार, महाप्रसादाच्या ठिकाणांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार आहे. देशाच्या इतिहासात सर्व धर्मीयांच्या सणांसाठी वर्षभराचा असा स्थायी आदेश काढण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ई-कॉमर्स, आयात अन्नपदार्थ, बेकरी आणि पॅकबंद पाणी या सर्वांवर एफडीएची कडक नजर असेल. ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवले जात असून, सण-उत्सवांमध्ये कोणतीही अप्रिय घटना घडू नये हा यामागील मुख्य उद्देश आहे. सण संपल्यानंतर १४ दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोषींवर न्यायालयात खटले दाखल केले जातील. इथून पुढे प्रत्येक सणासाठी वेगळा आदेश काढण्याची गरज उरणार नसून, हा स्थायी आदेश पूर्ण वर्षासाठी लागू राहील.

सणासुदीच्या काळात मिठाई, खावा, पनीर, तूप , सुकामेवा, मटण आणि चिकन या पदार्थांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मागणी अनेक पटींनी वाढत असल्याने भेसळ वाढण्याची शक्यताही वृद्धिंगत होते. हा प्रकार रोखण्यासाठी ‘एफडीए’ने वार्षिक कॅलेंडर तयार केले आहे. त्यान्वये सणांचे तीन स्तरांत वर्गीकरण केले आहे.

  • प्रथम श्रेणी (राज्यव्यापी): गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ आणि नववर्ष पूर्वसंध्या.
  • द्वितीय श्रेणी (प्रादेशिक): मकर संक्रांती, महाशिवरात्र, होळी, गुढीपाडवा, आषाढी व कार्तिक वारी, श्रावण मास, जन्माष्टमी, दहीहंडी, कोजागिरी आणि गुरुनानक जयंती.
  • तृतीय श्रेणी (स्थानिक): स्थानिक जत्रा, पालखी सोहळे आणि उरुस. कारवाईची प्रक्रिया ही सणाच्या 21 दिवस आधी सुरू होऊन सण संपल्यानंतर 30 दिवसांपर्यंत सुरू राहील.
    • मोहीम एकूण चार टप्प्यांत राबवणार
  • पहिला टप्पा (पूर्वतयारी): हाय-रिस्क अन्नाचे नकाशांकन, विशेष पथकांची नियुक्ती आणि प्रयोगशाळांना पूर्वसूचना.
  • दुसरा टप्पा (नाका तपासणी): गिरण्या, घाऊक मंड्या आणि वाहतुकीवर लक्ष. पहाटेच्या वेळी विशेष नाका तपासणी.
  • तिसरा टप्पा (सणाचा दिवस): सणाच्या दिवशी विशेष भरारी पथकांद्वारे प्रत्यक्ष ठिकाणांची सरप्राईज तपासणी.
  • चौथा टप्पा (कायदेशीर कारवाई): दोषींवर खटले दाखल करणे आणि अहवाल आयुक्तांकडे सादर करणे.
  • प्रक्रिया ही सणाच्या 21 दिवस आधी सुरू होऊन सण संपल्यानंतर 30 दिवसांपर्यंत सुरू राहील. ही मोहीम एकूण चार टप्प्यांत राबवली जाईल:
  • पहिला टप्पा (पूर्वतयारी): हाय-रिस्क अन्नाचे नकाशांकन, विशेष पथकांची नियुक्ती आणि प्रयोगशाळांना पूर्वसूचना.
  • दुसरा टप्पा (नाका तपासणी): गिरण्या, घाऊक मंड्या आणि वाहतुकीवर लक्ष. पहाटेच्या वेळी विशेष नाका तपासणी.
  • तिसरा टप्पा (सणाचा दिवस): सणाच्या दिवशी विशेष भरारी पथकांद्वारे प्रत्यक्ष ठिकाणांची सरप्राईज तपासणी.
  • चौथा टप्पा (कायदेशीर कारवाई): दोषींवर खटले दाखल करणे आणि अहवाल आयुक्तांकडे सादर करणे.
    • हाय रिस्क तपासणी नियोजन
  • उपवासाचे पदार्थ व दुग्धजन्य उत्पादने: भगर, साबुदाणा, राजगिरा यांचे आधीच नमुने घेणे तसेच बुरशीजन्य पदार्थांवर बारीक लक्ष ठेवणे.
  • मांस, पाणी व बर्फ: स्वच्छता, शीत साखळी आणि अधिकृत कत्तलखान्यांची वैधता तपासणे.
  • सजावट व रंग: मिठाईवर वापरला जाणारा चांदीचा वरख खरोखर शुद्ध चांदीचा आहे की नाही आणि खाद्यरंगांची मर्यादा तपासणे.
  • विशेष सण तपासणी: अक्षय्य तृतीयेला फळे पिकवण्याच्या पद्धती, नाताळमध्ये बेकरी उत्पादने, तर रमजान आणि ईद काळात विशेष अन्न तपासणी.

Comments are closed.