
- विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत नफा ७६० कोटी रुपये
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक: ‘आयसीआयसीआय लाइफ इन्शुरन्स लिमिटेडच्या’ संचालक मंडळाने ३० सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल मंजूर करून स्वीकारले.
२०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत वैयक्तिक विमा संरक्षण विभागात ४७.२ टक्के, तर अॅन्युइटी विभागात ५० टक्के वाढ झाली. यामुळे वैयक्तिक विमा संरक्षणाची एकूण रक्कम ३४.९ टक्क्यांनी वाढून २.३२ लाख कोटी रुपये झाली. यावरून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या विमा संरक्षणाची व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसते.
२०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीला नवीन व्यवसायातून मिळालेल्या विमा हप्त्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत २५ टक्के वाढ झाली. विमा हप्त्यांची ही रक्कम ११,८२१ कोटी रुपयांवर पोहोचली. नवीन व्यवसायाचे मूल्य (व्हीएनबी) २२.३ टक्क्यांनी वाढून १,२८३ कोटी रुपये झाले. या व्यवसायावरील नफ्याचे प्रमाण २६ टक्के होते. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीचा करपश्चात नफा (पीएटी) गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत २६.५ टक्क्यांनी वाढून ७६० कोटी रुपये झाला.
‘आयसीआयसीआय लाइफ इन्शुरन्स लिमिटेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मिश्रा म्हणाले, “ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणे हे ‘आयसीआयसीआय लाइफ’चे नेहमीच प्रमुख तत्त्व राहिले आहे. आगामी काळातही हेच तत्त्व आमच्या सर्व कामांना दिशा देत राहील. विमा संरक्षण आणि अॅन्युइटी योजना या आमच्या दीर्घकालीन व्यावसायिक धोरणाचा मुख्य भाग आहेत. भारतात या दोन्ही प्रकारच्या योजनांचा लाभ घेणाऱ्यांचे प्रमाण अजूनही कमी आहे. त्यामुळे या क्षेत्रांत मोठी संधी आहे. वितरणाचे देशभर पसरलेले जाळे, नावीन्यपूर्ण आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेली विमा उत्पादने, ग्राहकांना प्राधान्य देणारी विक्री व सेवा, गुणवत्तेचे उच्च निकष आणि जोखीम व भांडवलाच्या बाबतीत काटेकोर नियोजन यांच्या बळावर आमची कंपनी बदलत्या परिस्थितीतही सक्षमपणे काम करू शकते. नव्याने निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ घेण्याची आमची क्षमता आहे. व्यवसायवाढ, नफाक्षमता आणि जोखीम यांचा योग्य समतोल राखत नवीन व्यवसायाचे मूल्य (व्हीएनबी) सातत्याने वाढवणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.”
२०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीने ९९.३ टक्के विमा दावे निकाली काढले. तपासणीची गरज नसलेले दावे निकाली काढण्यासाठी सरासरी १.१ दिवस लागले. या काळात कंपनीने मृत्यू दाव्यांपोटी २,६२७ कोटी रुपये दिले. तसेच, पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतर किंवा ठरावीक कालावधीनंतर मिळणाऱ्या लाभांपोटी ८,६३४ कोटी रुपये दिले. गरजेच्या वेळी ग्राहकांना वेळेवर आर्थिक संरक्षण मिळावे आणि त्यांना आर्थिक सुरक्षिततेची खात्री वाटावी, यावर कंपनीचा भर असल्याचे यातून दिसते.
कंपनीचे नाव बदलून आता ‘आयसीआयसीआय लाइफ इन्शुरन्स लिमिटेड’ असे करण्यात आले आहे. भारतातील २० कोटींहून अधिक लोकांची स्वप्ने आणि आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याच्या कंपनीच्या २५ वर्षांच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या नव्या पर्वातही ग्राहकांना प्राधान्य देण्याच्या तत्त्वानुसार कंपनी आपल्या सर्व भागधारकांसाठी ‘हर कल आसान’ अर्थात ‘उद्याचा प्रत्येक दिवस सोपा’ करण्यासाठी प्रयत्नशील राहील.
२०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीने ५४ टक्के बचत विमा पॉलिसी जारी केल्याच दिवशी ग्राहकांना दिल्या. जीएसटी वगळून मोजलेले विमा हप्त्याच्या तुलनेतील एकूण खर्चाचे प्रमाण गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ३० बेसिस पॉईंट्सनी कमी होऊन १८.३ टक्के झाले. याच काळात बचत विमा पॉलिसींसाठी हे प्रमाण ९० बेसिस पॉईंट्सनी कमी होऊन ११.६ टक्के झाले.
Comments are closed.