NGN News
Latest Marathi News

30 सप्टेंबरपासून खुला होणार इव्हेंशनचा आयपीओ !

  • कमाईची संधी सोडू नका, जाणून घ्या सर्व तपशील

नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क

इव्हेंशन लिमिटेड आयपीओ शेअर बाजारात आयपीओ गुंतवणुकीच्या संधी शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे.एमआयसीई आणि कॉर्पोरेट इव्हेंट्स क्षेत्रात कार्यरत असलेल्या इव्हेंशन लिमिटेड  चा आयपीओ 30 सप्टेंबर 2026 रोजी खुला होणार आहे. कंपनी या आयपीओ च्या माध्यमातून 38.12 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. हा आयपीओ 5 ऑक्टोबर 2026 रोजी बंद होईल.इव्हेंशन लिमिटेड ने आयपीओ साठी 112 रुपये ते 118 रुपये प्रति इक्विटी शेअर असा प्राइस बँड निश्चित केला आहे. कंपनी या इश्यूच्या माध्यमातून एकूण 32,30,400 इक्विटी शेअर्स जारी करणार आहे. प्रत्येक शेअरचे फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे.कंपनीच्या शेअर्सचे प्रस्तावित लिस्टिंग एनएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर होणार आहे. आयपीओ ची अंतिम किंमत बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे निश्चित केली जाणार आहे.

रिटेल इन्वेस्टर्स साठी किती गुंतवणूक? या आयपीओचा मार्केट लॉट 1,200 शेअर्सचा आहे. रिटेल इन्वेस्टर्स ना किमान 2 लॉटसाठी अर्ज करावा लागणार आहे. म्हणजेच 118 रुपये या अप्पर प्राइस बँडनुसार किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 2.83 लाख रुपये गुंतवावे लागतील.एचएनआय गुंतवणूकदारांसाठी किमान 3 लॉटची आवश्यकता असून, अप्पर प्राइस बँडनुसार त्यासाठी सुमारे 4.25 लाख रुपये गुंतवणूक आवश्यक असेल.इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून कॉर्पोरेट प्रोफेशनल्स कॅपिटल प्रा. लि., तर रजिस्ट्रार म्हणून मुद्रा आरटीए व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड काम पाहणार आहे.तीन वर्षांत महसूल आणि नफ्यात वाढ कंपनीच्या आर्थिक कामगिरीत गेल्या तीन आर्थिक वर्षांत सुधारणा झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. आर्थिक वर्ष 24 मध्ये कंपनीचे एकूण उत्पन्न 87.29 कोटी रुपये होते. ते आर्थिक वर्ष 25 मध्ये 88.02 कोटी रुपये, तर आर्थिक वर्ष 26 मध्ये वाढून 100.62 कोटी रुपये झाले.

याच कालावधीत ईबीआयटीडीए देखील वाढला आहे. आर्थिक वर्ष 24 मध्ये ईबीआयटीडीए 4.13 कोटी रुपये, आर्थिक वर्ष 25 मध्ये 7.09 कोटी रुपये, तर आर्थिक वर्ष 26 मध्ये 10.19 कोटी रुपये झाला.कंपनीच्या प्रॉफिट आफ्टर टॅक्स मध्येही वाढ नोंदवण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 24 मधील 3.29 कोटी रुपये पीएटी वाढून आर्थिक वर्ष25 मध्ये 5.13 कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष 26 मध्ये 7.72 कोटी रुपये झाला.एमआयसीई आणि कॉर्पोरेट इव्हेंट्स क्षेत्रात विस्ताराचे लक्ष्य कॉर्पोरेट कंपन्यांकडून कॉन्फरन्स, इंसेण्टिव ट्रॅव्हल ,बिझनेस इव्हेंट्स आणि ब्रँड ऍक्टिव्हेशन्स साठी व्यावसायिक सेवा घेण्याचे प्रमाण वाढत असल्याने एमआयसीई क्षेत्रात संधी निर्माण होत आहेत. इव्हेंशन लिमिटेड  या वाढत्या बाजारपेठेत आपली उपस्थिती आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.

कंपनीच्या मते, आयपीओमधून मिळणारा निधी कर्जाचा भार व्यवस्थापित करण्यासोबतच वर्किंग कॅपिटल गरजा पूर्ण करण्यासाठी आणि व्यवसायाच्या पुढील विस्तारासाठी उपयोगी ठरणार आहे.इव्हेंशन लिमिटेड  आयपीओ 30 सप्टेंबर 2026 रोजी खुला होऊन 5 ऑक्टोबर 2026 रोजी बंद होणार आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी कंपनीचा डीआरएचपी/आरएचपी,आर्थिक स्थिती,आयपीओचे जोखीम घटक आणि इतर संबंधित माहिती तपासणे महत्त्वाचे आहे.

Comments are closed.