NGN News
Latest Marathi News

सीजीकडून नेक्स्ट जनरेशन आयई३, आयई४ जनरल पर्पज मोटर्स सिरीज लाँच

  • ग्लोबल लो व्होल्टेज मोटर्स पोर्टफोलिओचा विस्तार
  • नवीन उच्च-कार्यक्षम मोटर श्रेणीमध्ये प्रगत अभियांत्रिकी, जागतिक मानकांचे पालन आणि आव्हानात्मक औद्योगिक अनुप्रयोगांसाठी शाश्वततेचा मेळ

नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क

सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड (सीजी) या जागतिक अभियांत्रिकी कंपनी आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने  नेक्सोरा या नेक्स्ट जनरेशन आयई३ आणि आयई४ जनरल पर्पज मोटर्सच्या नवीन सिरीजच्या लाँचची घोषणा केली आहे. यामुळे कंपनीचा ग्लोबल लो व्होल्टेज (एलव्ही) मोटर्सचा पोर्टफोलिओ अधिक मजबूत झाला आहे. स्क्विरल केज इंडक्शन मोटर्सची ही नवीन श्रेणी सीजीच्या सध्याच्या आयई३ आणि आयई४ पोर्टफोलिओमध्ये भर घालणारी आहे, तसेच जगभरातील विविध औद्योगिक अनुप्रयोगांमध्ये उत्तम ऊर्जा कार्यक्षमता, कार्यक्षमतेची विश्वासार्हता आणि शाश्वत कामगिरी देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.

“रॉबस्ट.एफिशिएंट.रिलायबल.” (मजबूत.कार्यक्षम.विश्वासार्ह.) अशी संकल्पना असलेली नेक्सोरा श्रेणी उद्योगांना कामगिरीशी तडजोड न करता ऊर्जेचा वापर कमी करणे, लाईफसायकल खर्च कमी करणे आणि त्यांच्या शाश्वततेच्या उद्दिष्टांना पाठिंबा देण्यास सक्षम करण्याच्या सीजीच्या कटिबद्धतेला निदर्शनास आणते.

नेक्सोरा आयई३ आणि आयई४ मोटर्स उच्च पॉवर डेंसिटी, कमी तापमान वाढ, कमीत-कमी आवाज व कंपन, वाढीव सेवा आयुष्य आणि आयएस  12615 च्या गरजांपेक्षा जास्त तसेच आईसी बेंचमार्क मानकांना मागे टाकणारी ऊर्जा कार्यक्षमता देण्यासाठी प्रगत डिझाइनचा प्रीमियम-दर्जाच्या साहित्याशी मेळ घालतात.आयएस12615:2026,आयईसी 60034-30-1:2005 आणि आयएस 15999-1 शी सुसंगत असलेली नेक्सोरा श्रेणी सध्या सीजी280एसएम कास्ट-आयर्न टीईएफसी फ्रेम आकारात उपलब्ध आहे, जी २, ४, ६ आणि ८-पोल कॉन्फिगरेशनमध्ये ३७ केडब्ल्यू ते ९० केडब्ल्यू पॉवर रेंज समाविष्ट करते. ८० ते ३५५ फ्रेम आकारांमध्ये पसरलेला संपूर्ण नेक्सोरा पोर्टफोलिओ टप्प्याटप्प्याने बाजारपेठेत उपलब्ध करून दिला जात आहे, ज्यामुळे सीजीच्या ऊर्जा-कार्यक्षम लो व्होल्टेज मोटर्सच्या सर्वसमावेशक पोर्टफोलिओचा अधिक विस्तार होणार आहे.

या लाँचबद्दल मत व्यक्त करत सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेडचे ग्रुप सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर अमर कौल म्हणाले, “नेक्सोराची ही सुरुवात सीजीच्या नवोन्मेषी वृत्तीचे आणि उत्कृष्ट अंमलबजावणीचे प्रमाण आहे. सीजीमध्ये, आम्ही भारतात डिझाइन केलेली आणि तयार केलेली जागतिक दर्जाची उत्पादने विकसित करत आहोत, जी भारतासाठी आणि जगासाठी आहेत. उद्योग विश्वातून उच्च पातळीवरील कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि शाश्वततेची मागणी होत असताना, आम्ही नवोन्मेषामध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवू. आम्ही आमच्या ग्राहकांना बहुआयामी फायदे देणारे तंत्रज्ञान बाजारपेठेत आणू आणि जागतिक स्तरावर एक विश्वासार्ह तंत्रज्ञान भागीदार म्हणून सीजीचे स्थान अधिक दृढ करू.”

सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट – मोटर्सजतिंदर कौल म्हणाले, “नेक्सोराचे लाँच नवोन्मेष, ऊर्जा कार्यक्षमता आणि विश्वासार्हता यांचा मेळ घालणारे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक मोटर सोल्यूशन्स प्रदान करण्याच्या सीजीच्या कटिबद्धतेला दर्शवते. ग्राहकांना ऊर्जेचा वापर कमी करण्यास, उत्पादकता सुधारण्यास आणि टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप (मालकीहक्काचा एकूण खर्च) कमी करण्यास मदत करण्यासाठी नेक्सोरा श्रेणी डिझाइन करण्यात आली आहे. ही नवीन मालिका आमच्या ग्लोबल लो व्होल्टेज मोटर्स पोर्टफोलिओला अधिक मजबूत करते आणि अधिक शाश्वत भविष्य सक्षम करण्यावरील आमचे निरंतर लक्ष दर्शवते.”

नेक्सोरा आयई३ आणि आयई४ जनरल पर्पज मोटर्स ३ ऑगस्ट २०२६ पासून सीजीच्या विक्री आणि चॅनेल नेटवर्कद्वारे उपलब्ध होतील.

Comments are closed.