NGN News
Latest Marathi News

‘शिवस्वराज्य’ च्या उपक्रमातून स्त्री-पुरुष समानतेचा अनोखा संदेश !

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : मखमलाबाद परिसरातील शिवस्वराज्य कला,क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ विद्यानगर तर्फे विजयादशमी निमित्त दरवर्षी प्रमाणे अनोखा उपक्रम राबविण्यात आला. नवरात्रीतील घटाची विजयादशमीनिमित्त तळी भरणे हा कुळाचार सर्वत्र करण्यात येतो मात्र ही तळी पुरूषांच्या हातून भरली जाते मात्र शिवस्वराज्य मित्र मंडळातर्फे विजयादशमी ची तळी कन्यांच्या हातून भरण्यात येते. मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येतो.

नवरात्र हा आदिमाया आदिशक्तीचा जागर करण्याचा तसेच स्री शक्तीचा जागर करण्याचा उत्सव असल्याने मंडळातर्फे स्री-पुरूष समानतेचा संदेश देणारा हा उपक्रम राबविला जातो. परिसरातील नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व मखमलाबाद डॅाक्टर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष डॅा.ऋषिकेश जयंत आहेर तसेच प्रा.सौ.वैशाली आहेर-कोकाटे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येतो.

यावर्षी ची तळी स्वानंदी आहेर,दिशा सागर,शिवानी देसाई, पलक शर्मा, श्रद्धा शिंदे या कन्यांच्या हातून भरन्यात आली.
यावेळी डॅा.ऋषिकेश आहेर,प्रा.वैशाली आहेर-कोकाटे, तृप्ती आहेर, डॅा.नितल गवळे, अमेय औटे,मयुर गोळे, ओम मुठेकर,पवन कानकाटे,कुणाल मुर्तडक,श्लोक शिंदे,जतिन जाधव,जयेश भोईर,शुभम राठोड,संकेत माळी,प्रथमेश पारख आदींसह नागरिक उपस्थित होते.

Comments are closed.