
- भविष्यातील वाटचाल अधिक सुलभ करण्याच्या वचनासह नवीन ब्रँड ओळख सादर
- ‘हर कल आसान‘ ही टॅगलाईन, भारतीय ग्राहकांसाठी जीवन विमा अधिक सोपा, पारदर्शक, लवचिक आणि सुलभ बनवण्याच्या ब्रँडच्या कटिबद्धतेचे दर्शन घडवते.
नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आयसीआयसीआय लाइफ इन्शुरन्स लिमिटेड’ने आज आपली नवीन ब्रँड ओळख आणि टॅगलाइन — ‘हर कल आसान’ जाहीर केली.या नवीन ब्रँड ओळख आणि टॅगलाइनबद्दल आयसीआयसीआय लाइफ इन्शुरन्स लिमिटेडचे मार्केटिंग, डिजिटल आणि बँकाशुरन्स विभागाचे प्रमुख श्री. श्रीनिवास बालसुब्रमण्यन म्हणाले, “लाखो भारतीयांच्या जीवनात विश्वासाचे, सामर्थ्याचे आणि आर्थिक सेवांच्या सुलभ उपलब्धतेचे प्रतीक म्हणून आयसीआयसीआय हे नाव एक अढळ स्थान राखून आहे. गेल्या 25 वर्षात, 20 कोटींहून अधिक भारतीयांची स्वप्ने आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यास मदत करण्याचा बहुमान आम्हाला मिळाला आहे. या प्रवासात आम्ही भारताची अभूतपूर्व प्रगती आणि त्याचबरोबर येथील लोकांच्या आकांक्षांमध्ये झालेला महत्त्वपूर्ण बदल अनुभवला आहे.”
आजच्या वेगवान युगात जग अधिकाधिक गुंतागुंतीचे आणि अनिश्चित बनले आहे. करिअरमधील बदल, बदलती कौटुंबिक रचना, वाढलेले आयुर्मान आणि आर्थिक प्राधान्यक्रमांमधील बदल यांमुळे दीर्घकालीन नियोजन करणे पूर्वीपेक्षा अधिक आव्हानात्मक झाले आहे. या अनिश्चिततेचा सामना करण्यात जीवन विम्याची भूमिका महत्त्वाची असली तरी आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याची पारंपरिक प्रक्रिया अनेकदा गुंतागुंतीची वाटत आली आहे.
भविष्याची तयारी करताना आयुष्यातील गुंतागुंत वाढण्याऐवजी त्यातून स्पष्टता, आत्मविश्वास आणि मनःशांती मिळायला हवी, असा आमचा ठाम विश्वास आहे. आमची नवीन ब्रँड ओळख ही केवळ नावापुरती मर्यादित नाही. आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याचा अनुभव अधिक सोपा, पारदर्शक, लवचिक आणि सुलभ बनवण्याच्या आमच्या व्यापक कटिबद्धतेचे ती प्रतिबिंब आहे. 25 वर्षांच्या भक्कम पायावर आधारित, आम्ही ग्राहकांसाठी अधिक उपयुक्तता निर्माण करणे, उद्योगात उत्कृष्टतेचे नवीन निकष प्रस्थापित करणे आणि ‘2047 पर्यंत सर्वांसाठी विमा’ या राष्ट्रीय उद्दिष्टामध्ये सक्रिय योगदान देणे सुरूच ठेवू.”
आपल्या नवीन ब्रँड वचनाद्वारे, कंपनीचे उद्दिष्ट जीवन विम्याबाबतच्या चर्चेला केवळ संभाव्य संकटांपासून संरक्षण मिळवण्यापुरते मर्यादित न ठेवता, त्यापलीकडे नेण्याचे आहे. भविष्य कसे असावे याबद्दल अधिक माहितीपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण निर्णय सहज तसेच सोयीस्करपणे घेण्यास लोकांना सक्षम करणे, हा यामागचा उद्देश आहे; आणि अशा प्रकारे, आपल्या भागधारकांसाठी ‘हर कल आसान’ करणे हे कंपनीचे ध्येय आहे.
Comments are closed.