नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सोल्फेज स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स आयपीओ ओपनिंग: स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रीमियम होम एंटरटेनमेंट क्षेत्रातील सोल्फेज स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आपला इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओघेऊन येत आहे. कंपनीचा आयपीओ 30 सप्टेंबर 2026 रोजी सब्स्क्रिप्शनसाठी खुला होणार असून 5 ऑक्टोबर 2026 रोजी बंद होईल. या आयपीओ च्या माध्यमातून कंपनी 21.78 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे.आयपीओची किंमत 55 रुपये प्रति शेअर सोल्फेज स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स आयपीओअंतर्गत एकूण 39,60,000 इक्विटी शेअर्स जारी केले जाणार आहेत. प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये असून,आयपीओची इश्यू प्राइस 55 रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित करण्यात आली आहे.कंपनीच्या इक्विटी शेअर्सचे लिस्टिंग बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर करण्याचा प्रस्ताव आहे. आयपीओची संपूर्ण इश्यू प्राइस अर्जाच्या वेळी भरावी लागणार आहे.
रिटेल गुंतवणूकदारांसाठी किती रक्कम? या आयपीओमध्ये एका मार्केट लॉटमध्ये 2,000 इक्विटी शेअर्स असतील.रिटेल इन्वेस्टर्स ना किमान 2 लॉटसाठी अर्ज करावा लागणार आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना किमान 2.20 लाख रुपये गुंतवावे लागतील.
एचएनआय गुंतवणूकदारांसाठी किमान 3 लॉटची अट असून, त्यासाठी 3.30 लाख रुपये इतकी किमान गुंतवणूक आवश्यक असेल. फिनशोर मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड या आयपीओची बुक रनिंग लीड मॅनेजर आहे, तर केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे.
आयपीओमधून मिळालेला पैसा कुठे वापरणार? सोल्फेज स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स आयपीओमधून मिळणाऱ्या निधीचा मोठा भाग कंपनीच्या विस्तारासाठी वापरला जाणार आहे. कंपनीने 12 नवीन शो-रूम सुरू करण्यासाठी 8.54 कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन केले आहे.याशिवाय कंपनीच्या वाढत्या व्यवसायासाठी 9.67 कोटी रुपये वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट्स पूर्ण करण्यासाठी वापरले जातील. उर्वरित 1.80 कोटी रुपये जनरल कॉर्पोरेट परपजेस साठी वापरण्याचे नियोजन आहे.
कंपनीचा आर्थिक परफॉर्मन्स सुधारला सोल्फेज स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्सच्या आर्थिक कामगिरीत मागील तीन आर्थिक वर्षांत सुधारणा झाल्याचे कंपनीने सांगितले आहे. कंपनीचे एकूण उत्पन्न आर्थिक वर्ष 23 मध्ये 12.74 कोटी रुपये होते. ते आर्थिक वर्ष 24 मध्ये वाढून 19.84 कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष 25 मध्ये 21.28 कोटी रुपये झाले.ईबीआयटीडीए देखील आर्थिक वर्ष 23 मधील 0.66 कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष 24 मध्ये 1.73 कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष 25 मध्ये 3.24 कोटी रुपये झाले. त्याचप्रमाणे प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे पीएटी 0.36 कोटी रुपयांवरून 1.76 कोटी रुपये आणि त्यानंतर आर्थिक वर्ष 25 मध्ये 2.13 कोटी रुपये झाला.
प्रीमियम होम एंटरटेनमेंट क्षेत्रात विस्तार सोल्फेज स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी होम थिएटर, हाय-एंड ऑडिओ, प्रोजेक्टर आणि स्मार्ट होम ऑटोमेशन यांसारख्या उत्पादनांमध्ये कार्यरत आहे. एक्सपिरिएंस सेंटर मॉडेलच्या माध्यमातून ग्राहकांना प्रीमियम ऑडिओ-व्हिडिओ आणि स्मार्ट होम सोल्यूशन्स उपलब्ध करून देण्यावर कंपनीचा भर आहे.
कंपनीच्या मते, स्मार्ट आणि कनेक्टेड घरांची वाढती मागणी तसेच प्रीमियम होम एंटरटेनमेंट सोल्यूशन्समधील वाढता कल यामुळे या क्षेत्रात विस्ताराच्या संधी निर्माण होत आहेत. आयपीओनंतर 12 नवीन शोरूम्स च्या माध्यमातून कंपनी आपले रिटेल नेटवर्क वाढवण्याचे लक्ष्य ठेवत आहे.सोल्फेज स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स आयपीओ ची तारीख, आयपीओ ची किंमत, इश्यू साइज, लॉट साइज आणि निधीचा वापर यामुळे हा एसएमई आयपीओचर्चेत आला आहे. मात्र आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी कंपनीचे अधिकृत आयपीओदस्तऐवज, जोखीम घटक आणि आर्थिक माहिती तपासणे महत्त्वाचे आहे.
Comments are closed.