
- सीमाताई हिरे खऱ्याखुऱ्या १ लाख भावांच्या लख पती दीदी : सौ.चित्राताई वाघ
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार सौ. सीमा महेश हिरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर गोरगरीब, कष्टकरी आणि समाजातील विविध घटकांसाठी एक लाख राख्यांचे वितरण करण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौ. चित्राताई वाघ यांच्या शुभहस्ते त्रिमूर्ती चौक, पेठे हायस्कूल भाजी बाजार येथे उत्साहात करण्यात आला.
सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांपासून शहराची स्वच्छता राखणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांपर्यंत, महापालिका कर्मचारी, रिक्षाचालक, भाजीविक्रेते तसेच विविध कष्टकरी बांधवांना मायेची राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्याची ही अनोखी परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. समाजातील कष्टकरी घटकांप्रती आपुलकी, सन्मान आणि बंधुभाव व्यक्त करण्याचा हा उपक्रम ठरत आहे.
यावेळी सौ. चित्राताई वाघ आणि आमदार सौ. सीमाताई हिरे यांनी भाजीविक्रेत्या बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. या आपुलकीच्या नात्याला प्रतिसाद देताना भाजीविक्रेत्या बांधवांनी कोणी मेथीची जुडी, तर कोणी काकडी व इतर भाजीपाला भेट देत आनंद व्यक्त केला. या प्रसंगामुळे रक्षाबंधनाचा सण अधिकच भावनिक आणि आपुलकीचा ठरला.
यावेळी बोलताना सौ. चित्राताई वाघ म्हणाल्या की, “एक लाख राख्यांच्या माध्यमातून आमदार सीमाताई हिरे या खऱ्या खुऱ्या १ लाख भावांच्या लख पती दीदी .”समाजातील विविध घटकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
ढोल-ताशांचा जल्लोष, उत्साहपूर्ण वातावरण आणि आपुलकीच्या भावनेने या उपक्रमाचा शुभारंभ संस्मरणीय ठरला. कष्टकरी हातांचा सन्मान, मायेची भावना आणि संरक्षणाचा विश्वास देणारा हा रक्षाबंधनाचा अनोखा उत्सव महाराष्ट्रभर पोहोचविण्याचा संकल्प या उपक्रमातून करण्यात आला आहे.
यावेळी जयश्री अहेरराव,स्वाती भामरे,संध्या कुलकर्णी,रश्मी हिरे,शर्वरी कुलकर्णी,धनश्री गिरासे,भाग्यश्री ढोमसे,ज्योती कवर,विद्या शेळके,डॉ वैभव महाले,केतन औसरकर,श्रीकृष्ण कुलकर्णी,नवनाथ पारखे,जितेंद्र पाटील,माधवी मोराणकर,संगीता पाटील,गायधनी ताई,राम पाटील,राजेंद्र जडे,महेंद्र पाटील,रोहन कानकाटे,परमानंद पाटील,किरण थोरात,निखिल पाटील,हर्षद बुचुडे,निखिल चौधरी,अक्षय गांधी,उमेश पाटील,आशुतोष मिश्रा,पार्थ सूर्यवंशी,वेदांत कदम,नयन चुंबळे आदी उपस्थित होते
Comments are closed.