NGN News
Latest Marathi News

टीव्हीएस मोटरकडून मिलियन आर विशेष एडिशनसह टीव्हीएस आयक्यूब च्या 10 लाख कुटुंबांचा टप्पा साजरा

·         खास ऑरोरा ग्रीन ड्युअल टोन रंगासह वैशिष्ट्यपूर्ण मिलियनआर डिझाइन घटकांचा समावेश

·         पुढच्या बाजूला असलेले युटिलिटी स्टोरेज कंपार्टमेंट आणि टाईप सी चार्जिंग पोर्टसह दैनंदिन वापरातील सुविधा अधिक वाढवल्या

·         मिलियनआर एडिशन ही 145 किमी आयडीसी रेंज असलेल्या टीव्हीएस आयक्यूब 3.5किलोवॅट-अवर व्हेरिएंटवर आधारित आहे.

नाशिक: टीव्हीएस आयक्यूब ने 10 लाख ग्राहकांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याच्या पार्श्वभूमीवर, टीव्हीएस वेणू समूहाचा भाग आणि दुचाकी व तीनचाकी वाहनांची जागतिक स्तरावर लौकिकप्राप्त उत्पादक असलेल्या टीव्हीएस मोटर कंपनीने, आज टीव्हीएस आयक्यूब  मिलियनआर विशेष एडिशन सादर केली. टीव्हीएस आयक्यूब च्या माध्यमातून इलेक्ट्रिक मोबिलिटीचा स्वीकार करणाऱ्या 10 लाखांहून अधिक ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वास आणि आत्मविश्वासापासून प्रेरणा घेत ही नवीन मिलियनआर एडिशन या महत्त्वपूर्ण यशाचा गौरव करत आहे. यातून भारतातील ग्राहकांची पसंती असलेली फॅमिली ईव्ही  म्हणून टीव्हीएस आयक्यूब चे स्थान अधिक मजबूत होत आहे.टीव्हीएस मोटरच्या ईव्ही पोर्टफोलिओमधील प्रमुख इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून, टीव्हीएस आयक्यूब ने इलेक्ट्रिक दुचाकी श्रेणीतील कंपनीचे नेतृत्व अधिक बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याच योगदानामुळे टीव्हीएस मोटरने यावर्षी बाजारपेठेतील वाट्याच्या आधारे क्रमांक 1 चे स्थान मिळवले आहे.

लोकप्रिय टीव्हीएस आयक्यूब  3.5 किलोवॅट-अवर व्हेरिएंटवर आधारित, मिलियनआर विशेष एडिशन 145 किमीची आयडीसी रेंज देते.

नॉर्दन लाईट्स पासून प्रेरित खास ऑरोरा ग्रीन ड्युअल टोन रंगासह, प्रीमियम सीट अपहोल्स्ट्री आणि विशेष मिलियनआर बॅजिंग यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन घटकांचा यात समावेश आहे. नवीन समोरील युटिलिटी स्टोरेज कंपार्टमेंटमुळे या विशेष एडिशनमध्ये दैनंदिन वापरातील सुविधा आणखी वाढतात. त्यामुळे एकूण स्टोरेज क्षमता 32 लिटरवरून 35.5 लिटरपर्यंत वाढते. यासोबत इंटिग्रेटेड टाईप सी चार्जिंग पोर्ट आणि 118 हून अधिक कनेक्टेड तंत्रज्ञान वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.टीव्हीएस मोटरच्या दीर्घकाळापासूनच्या प्रमुख स्कूटर ब्रँड टीव्हीएस ज्युपिटर पासून भारतातील ग्राहकांची पसंती असलेल्या फॅमिली ईव्ही  टीव्हीएस आयक्यूब पर्यंत, कंपनीने पॉवरट्रेन कोणतीही असो, मिळालेल्या या माहितीचे दळणवळण उपाययोजनांमध्ये अर्थात मोबिलिटी सोल्यूशन्समध्ये सातत्याने रूपांतर केले आहे.

या सादरीकरणाच्या निमित्ताने बोलताना टीव्हीएस मोटर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष – कम्युटर आणि ईव्ही  व्यवसाय प्रमुख तसेच कॉर्पोरेट ब्रँड आणि मीडिया प्रमुख अनिरुद्ध हलदर म्हणाले, “भारतामध्ये स्कूटरचा प्रसार वाढवण्यात टीव्हीएस मोटरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये आम्ही ड्राइव्हट्रेन कोणतीही असो, भारतीय कुटुंबांना पुढे नेणारी दळणवळण सुविधा तयार करण्यावर सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये प्रासंगिकता, विश्वासार्हता आणि सर्वोत्तम श्रेणीतील गुणवत्तेची बांधिलकी कायम ठेवली आहे. टीव्हीएस ज्युपिटर चा 9 दशलक्षांचा टप्पा आणि टीव्हीएस आयक्यूब चा 1 दशलक्ष ग्राहकांचा टप्पा हा या प्रवासातील महत्त्वपूर्ण अध्याय आहे. यामुळे भारतीय कुटुंबांच्या बदलत्या गरजांनुसार विकसित होत राहण्याच्या आमच्या भूमिकेला आणखी बळ मिळते. 2016 मध्ये टीव्हीएस ज्युपिटरने 1 दशलक्ष ग्राहकांचा टप्पा गाठल्याचा आनंद मिलियनआर एडिशनच्या माध्यमातून साजरा केला होता. आज टीव्हीएस आयक्यूब असलेली कुटुंबे 1 दशलक्ष संख्येपर्यंत पोहोचली आहेत. टीव्हीएस आयक्यूब  स्वतःच्या मिलियनआर एडिशनसह या परंपरेत सहभागी होत आहे. टीव्हीएस आयक्यूब वर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे मी आभार मानतो. त्यांचा विश्वास भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटीने केलेली प्रगती दर्शवतो आणि कुटुंबांना पुढे नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहण्याची आम्हाला प्रेरणा देतो.”

टीव्हीएस आयक्यूब  मिलियनआर एडिशन ही 10 लाख ग्राहकांचा टप्पा गाठल्याच्या यशावर आधारित असून, भारतातील ग्राहकांची पसंती असलेल्या फॅमिली ईव्ही चे अधिक आकर्षक रूप सादर करते. यात वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन, तंत्रज्ञान आणि दैनंदिन वापरातील सुविधा यांचा संगम करण्यात आला आहे. टीव्हीएस आयक्यूब  मिलियनआर विशेष एडिशनची किंमत 1,40,138 रु. (कर्नाटक येथे एक्स-शोरूम किंमत) आहे. टीव्हीएस आयक्यूब  पोर्टफोलिओची सुरुवातीची किंमत 1,11,310 रु. (कर्नाटक येथे एक्स-शोरूम किंमत) असून, बास च्या किमती 59,999 रु. पासून सुरू होतात.

अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या: https://www.tvsmotor.com/electric-scooters/tvs-iqube

Comments are closed.