
- पोको एम8x 5जी विशाल ७९०० एमएएच बॅटरीसह लाँच
- विशाल ७९०० एमएएच बॅटरी, कॉर्निंग® गोरिला® ग्लास ७आय ६.९-इंच १२० हर्ट्झ अॅडप्टिव्ह डिस्प्ले आणि भारतातील पहिले स्नॅपड्रॅगन ४ जेन ५ मोबाईल प्लॅटफॉर्मसह, पोको एम8x 5जी काम, मनोरंजन आणि इतर सर्व गोष्टींसाठी डिझाइन करण्यात आला आहे
नाशिक: शाओमी इंडियाने आज पोको एम8x 5जी च्या लाँचची घोषणा केली. नवीन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४ जेन ५ मोबाईल प्लॅटफॉर्मद्वारे संचलित असलेला हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे. विशाल ७९०० एमएएच बॅटरी, दैनंदिन टिकाऊपणा, मोठा ६.९-इंच १२० हर्ट्झ अॅडप्टिव्ह डिस्प्ले आणि एक वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन एकत्र आणत पोको एम8x 5जी आजच्या वापरकर्त्यांची राहणीमान, काम आणि मनोरंजनाची शैली लक्षात घेऊन विश्वासार्ह स्मार्टफोन अनुभव प्रदान करतो.मुख्यतः, पोको एम8x 5जी वापरकर्त्यांना चार्जरच्या कटकटीपासून अधिक स्वातंत्र्य देण्यावर लक्ष केंद्रित करतो. नवीन शहरात नेव्हिगेशन करणे असो, दिवसभर काम करायचे असो, प्रवासात व्हिडिओ स्ट्रीम करणे असो, ऑनलाईन क्लासेसला उपस्थित राहणे असो किंवा रात्री उशिरापर्यंत कनेक्ट राहणे असो, हा स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या व्यस्त दिवसांमध्ये सतत सोबत राहण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
दीर्घकाळ टिकणारी ७९०० एमएएच क्षमतेची बॅटरी
पोको एम8x 5जी मध्ये विशाल ७९०० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना चार्जरचा विचार न करता आपल्या महत्त्वाच्या कामांवर अधिक वेळ घालवण्याचे स्वातंत्र्य मिळते. चार्ज करण्याची वेळ येते तेव्हा, ४५ वॅट फास्ट चार्जिंग वापरकर्त्यांना त्वरित डिवाईस चार्ज करत त्यांच्या दैनंदिन दिनक्रमात त्वरित परत येण्यास मदत करते, आणि यासोबत ४५ वॅट चार्जर बॉक्समध्ये समाविष्ट आहे. हा डिवाईस २२.५ वॅट रिव्हर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करते, ज्यामुळे गरजेच्या वेळी सुसंगत अॅक्सेसरीज किंवा दुसरा स्मार्टफोन चार्ज करता येतो.
डेस्कच्या पलीकडच्या आयुष्यासाठी निर्मिती
स्मार्टफोन क्वचितच एका जागी राहतो. तो ऑफिसच्या डेस्क आणि कॉलेजच्या क्लासरूमपासून ते गर्दीचा प्रवास, वीकेंड ट्रिप्स आणि घराबाहेरील वातावरणापर्यंत उपयुक्त ठरतो.
पोको एम8x 5जी मध्ये आयपी६४ रेटिंग देण्यात आले आहे, जे धूळ आणि पाण्याच्या थेंबांपासून संरक्षण प्रदान करते. प्रवासादरम्यान अचानक आलेली सर असो किंवा धुळीचे वातावरण असो, हे अतिरिक्त संरक्षण वापरकर्त्यांना दिवसभरात स्मार्टफोन कुठेही घेऊन जाण्यासाठी अधिक आत्मविश्वास देते.
टिकाऊपणाचा आणखी एक स्तर जोडत, या डिवाईसच्या डिस्प्लेला कॉर्निंग गोरिला ग्लास ७आयचे संरक्षण देण्यात आले आहे, जे डिवाईसला दैनंदिन वापराचा ताण अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यास मदत करते.
तुमच्या आवडीच्या प्रत्येक गोष्टीसाठी मोठी आणि अधिक स्मूथ स्क्रीन
पोको एम8x 5जी मध्ये १२० हर्ट्झपर्यंतच्या अॅडप्टिव्ह रिफ्रेश रेटसह ६.९-इंच मोठा इमर्सिव्ह डिस्प्ले देण्यात आला आहे, जो वापरकर्त्यांना मनोरंजन, ब्राऊझिंग आणि दैनंदिन कामांसाठी मोठी स्क्रिन प्रदान करतो.
लांबच्या प्रवासात आवडीचा शो पाहणे असो, स्वयंपाक करताना रेसिपी फॉलो करणे असो, व्हिडिओ कॉलला जॉईन होणे असो किंवा सोशल मीडिया स्क्रोल करणे असो, हा मोठा डिस्प्ले कंटेंटचा आनंद घेण्यासाठी आणि डिवाईस वापरण्यासाठी अधिक जागा देतो.
१२० हर्ट्झ अॅडप्टिव्ह रिफ्रेश रेट अधिक स्मूथ स्क्रोलिंग आणि ट्रान्सिशन्स सक्षम करतो, तर २४० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट विशेषतः वेगाने वापर करताना त्वरित प्रतिसाद देणारा टच अनुभव प्रदान करतो.
स्मार्टफोनवर जास्त वेळ घालवणाऱ्या वापरकर्त्यांसाठी डिस्प्लेमध्ये लो ब्लू लाईट, फ्लिकर-फ्री आणि सर्कॅडियन फ्रेंडली व्ह्यूइंगसाठी टीयूव्ही सर्टिफिकेशन्स देखील समाविष्ट आहेत, जी डोळ्यांना अधिक आरामदायी व्ह्यूइंग अनुभवासाठी मदत करतात.
फॉर्म व फंक्शन (लुक व उपयुक्तता) यांचा समतोल साधणारी डिझाइन
या डिवाईसच्या रिअल पॅनेलवर लेदर-इन्स्पायर्ड बॅक फिनिश देण्यात आली आहे, जी स्मार्टफोनला एक वैशिष्ट्यपूर्ण स्पर्श-अनुभूती आणि समकालीन लूक देते. दैनंदिन दिनक्रमात सहज बसण्यासाठी डिझाइन केलेल्या फॉर्ममध्ये हा डिवाईस मोठी बॅटरी आणि मोठा डिस्प्ले यांचा उत्तम समतोल साधतो.
३०० टक्क्यांपर्यंत व्हॉल्यूम असणाऱ्या ड्युअल स्पीकर्समुळे मनोरंजनाचा अनुभव अधिक उत्साहवर्धक होतो, ज्यामुळे व्हिडिओ, संगीत आणि कॉल्स अधिक प्रभावी वाटतात. साईड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सोयीस्कर आणि सुरक्षित अॅक्सेस प्रदान करतो, तर समाविष्ट करण्यात आलेला ३.५ मिमी हेडफोन जॅक वापरकर्त्यांना त्यांचे विद्यमान वायर्ड हेडफोन्स वापरण्याचे स्वातंत्र्य देतो..
भारतातील पहिला स्नॅपड्रॅगन ४ जेन ५ स्मार्टफोन
पोको एम8x 5जी भारतामधील स्मार्टफोन बाजारपेठेत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४ जेन ५ मोबाईल प्लॅटफॉर्मद्वारे संचलित भारतातील पहिला स्मार्टफोन आहे.
४एनएम प्रक्रियेवर आधारित हा नवीन प्लॅटफॉर्म कामगिरी आणि ऊर्जा कार्यक्षमतेचा उत्तम समतोल साधण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. हा प्लॅटफॉर्म पोको एम8x 5जी ला अॅप्समधील अदलाबदल, सोशल मीडिया ब्राऊझिंग, कंटेंट स्ट्रीमिंग, नेव्हिगेशन आणि कॅज्युअल गेमिंग यांसारख्या दैनंदिन गरजा सहज हाताळण्यास सक्षम करते, तसेच स्मार्टफोनच्या विशाल ७९०० एमएएच बॅटरीला उत्तम साथ देते.
हा डिवाईस ६ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह येतो, ज्यामध्ये १ टीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा समाविष्ट आहे. यामुळे वापरकर्त्यांना अधिक फोटो, व्हिडिओ, अॅप्स ठेवण्याची आणि मनोरंजनाची आनंद घेण्याची सुविधा मिळते.
प्रत्येक क्षण कॅप्चर करण्यासाठी ५० मेगापिक्सल कॅमेरा
पोको एम8x 5जी मध्ये समर्पित फ्लिकर सेन्सरसह ५० मेगापिक्सल एआय ड्युअल-कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जो वापरकर्त्यांना दैनंदिन आयुष्यातील खास क्षण टिपण्यासाठी वैविध्यपूर्ण कॅमेरा सिस्टम प्रदान करतो.
मित्र आणि कुटुंबासोबत त्वरित घेतलेले फोटो असो, वीकेंडच्या ट्रिप्सचे क्षण टिपणे असो किंवा सोशल मीडियासाठी कंटेंट तयार करणे असो, हा कॅमेरा दैनंदिन फोटोग्राफी अधिक सोपी आणि वैविध्यपूर्ण बनवतो. पोर्ट्रेट मोड वापरकर्त्यांना अधिक फोकस्ड आणि आकर्षक फोटो काढण्यास मदत करतो, तर ड्युअल व्हिडिओ मोड वापरकर्त्यांना फ्रंट आणि रिअर अशा दोन्ही कॅमेऱ्यांमधून एकाच वेळी क्षण टिपण्याची सुविधा देतो, ज्यामुळे घडून येणारी संपूर्ण गोष्ट सांगणे अधिक सोपे होते.
यातील ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्ससाठी उत्तम आहे, ज्यामुळे पोको एम8x 5जी मित्र, कुटुंब आणि सहकाऱ्यांशी कनेक्ट राहण्यासाठी तितकेच सोयीस्कर बनतो.
Comments are closed.