
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक: सेंट फ्रान्सिस हायस्कूल, राणेनगर, नाशिक येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ऑगस्टिन पिंटो आणि व्यवस्थापकीय संचालिका डॉ. ग्र्रेस पिंटो मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
PSI संतोष फुंडे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून psi वर्षा बोरसे, psi स्वप्नाली पलांडे, मयुर चौधरी, समीर देशपांडे ,paster राहुल चारवीला , प्रवीण बागुल, मानसी सरोदे, राजेश शिंदे, युती छत्रिशा, मयुर टिपरे उपस्थित होते. राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राज्यगीताने वातावरणात देशभक्तीचे रंग भरले गेले. यानंतर ध्वजाला मानवंदना देण्यात आली.
ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. कार्यक्रमाचा प्रारंभ प्रभू येशूंच्या प्रार्थनेने आणि पवित्र बायबलमधील वचनांच्या वाचनाने झाला. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सुंदर प्रार्थना गीत सादर केले, इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर बहारदार नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये त्रिरंगी फुले तयार करणे, निबंध लेखन, बुकमार्क बनवणे आणि राष्ट्रीय घोषणा तयार करणे अशा स्पर्धा रंगल्या. तसेच इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने यात सहभाग नोंदवला. सर्व विजेत्या गुणवंत विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी नेहमी राष्ट्रीय मूल्यांचे जतन केले पाहिजे. वाईट सवयी आणि नकारात्मक गोष्टींपासून दूर राहून देशाच्या प्रगतीसाठी नेहमी पुढाकार घेतला पाहिजे.” हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील, विभाग प्रमुख शीतल चिंचोलीकर, उषा शेट्टी व इतर सर्व शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले.
Comments are closed.