NGN News
Latest Marathi News

क्रोमाच्या स्वातंत्र्यदिन सेलमध्ये घरगुती उपकरणांवर सरसकट २०% सूट

एक्सचेंज बोनस आणि अनेक ऑफर्स;  १६ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये घरगुती उपकरणे, लॅपटॉप, स्मार्टफोन, टीव्ही आणि इतर उत्पादनांवर मोठी बचत करण्याची संधी 

नाशिक: एनजीएन न्यूज

टाटा समूहातील एक सदस्य आणि भारताची आघाडीची ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर कंपनी ‘क्रोमा’ने आपल्या ‘स्वातंत्र्यदिन सेल’ची घोषणा केली आहे. या सेलअंतर्गत घरगुती उपकरणे, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि टेक्नॉलॉजी उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. ग्राहक टाटा नेउ रिवॉर्ड्स, बँक कॅशबॅक, एक्सचेंज बेनिफिट्स आणि बोनसद्वारे अजून जास्त लाभ मिळवू  शकतात.

होम अप्लायन्सेस, किचन अप्लायन्सेस आणि होम एंटरटेनमेंटवर फ्लॅट २०% पर्यंत सूट मिळणार आहे.या विशेष सेलमध्ये ग्राहकांना आकर्षक बचतीसह आपले घर आधुनिक तंत्रज्ञानाने अपग्रेड करण्याची उत्तम संधी मिळत आहे. या ऑफरमध्ये टीव्ही, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर्स, वॉशिंग मशिन्स, किचन अप्लायन्सेस, होम ऑडिओ, एअर प्युरिफायर्स आणि व्हॅक्यूम क्लीनर्ससह दैनंदिन वापरातील अनेक श्रेणींतील निवडक उत्पादनांवर विशेष सवलती उपलब्ध आहेत. ग्राहक सॅमसंग ७५” निओ क्यूएलईडी 8के टीव्हीवर ६०% पर्यंत सूट मिळवू शकतात. तसेच, ५५” पर्यंतचा कोणताही टीव्ही खरेदी केल्यास एलजी साउंडबार एस40टी केवळ १०,९९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, ८ किलो टॉप लोड वॉशिंग मशीनची सुरुवातीची किंमत २१,७०० रुपयांपासून असून, ४३६ लिटर फ्रॉस्ट-फ्री रेफ्रिजरेटरची सुरुवातीची किंमत ४३,७९० रुपयांपासून आहे. या आकर्षक ऑफर्समुळे ग्राहकांना प्रीमियम होम आणि किचन अप्लायन्सेसवर मोठी बचत करत आपल्या घराचे सहज अपग्रेडेशन करता येणार आहे. *अटी व शर्ती लागू.

क्रेडिट कार्ड वापरा, बचत वाढवा.स्वतंत्रता दिन सेल मधील बचतीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी, क्रोमा रुपे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त फायदे देत आहे. ही ऑफर सर्व श्रेणींवर आणि कार्ड कोणत्याही बँकेचे असले तरीही लागू आहे. ग्राहक खरेदीच्या मूल्यावर झटपट डिस्काउंट मिळवू शकतात.’फुल स्वाइप’वर ५,००० रुपयांच्या खरेदीवर २५० रुपयांपासून डिस्काउंट सुरू होतो,तर ‘ईएमआय’वर २०,००० रुपयांच्या खरेदीवर १,२५० रुपयांपासून डिस्काउंट सुरू होते.याशिवाय, ग्राहक टाटा नेउ क्रेडिट कार्डवर ५% पर्यंत नेउकॉइन्सचा अतिरिक्त लाभ घेऊन आपली बचत आणखी वाढवू शकतात.

लॅपटॉप्सवरील डील्स अजिबात चुकवू नका.जे ग्राहक आपला लॅपटॉप अपग्रेड करू इच्छितात, त्यांच्यासाठी क्रोमा विविध प्रकारच्या डिवाइसेसवर आकर्षक सूट देत आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑफर्सचा समावेश आहे. विंडोज लॅपटॉप्सवर विद्यार्थ्यांना १०% पर्यंत सूट मिळत आहे. मॅकबुक एअर एम5 प्रति महिना ५,६२१* रुपयांच्या किफायतशीर सुरुवातीच्या ईएमआयवर उपलब्ध आहे. आयपॅड अकरावा जनरेशन प्रति महिना १,९३९* रुपयांच्या किफायतशीर सुरुवातीच्या ईएमआयवर उपलब्ध आहे. स्नॅपड्रॅगन लॅपटॉप्सवर ८,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस दिला जात आहे. तसेच, निवडक लॅपटॉप्सवर ग्राहकांना ३२,००० रुपये किमतीचे एआय ग्लासेस मोफत मिळतील*.

विशेष ऑफर्ससह लेटेस्ट स्मार्टफोनवर अपग्रेड करा.ग्राहक टाटा नेउ रिवॉर्ड्स, बँक कॅशबॅक, एक्सचेंज बेनिफिट्स, बोनस आणि इतर डिस्काउंट्सचा लाभ घेऊन काही लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन आकर्षक किमतीत खरेदी करू शकतात. फ्लॅगशिप व्हिवो एक्स300 एफईची सुरुवातीची किंमत ५१,८००* रुपयांपासून आहे. गुगल पिक्सेल १०ची सुरुवातीची किंमत ६७,९९९* रुपयांपासून उपलब्ध आहे, तर आयफोन १७ प्रोची सुरुवातीची किंमत ७५,९००* रुपयांपासून आहे. याशिवाय, निवडक स्मार्टफोनच्या श्रेणीवर ग्राहकांना ५,९९० रुपये किमतीचे सोनी हेडफोन्स आणि ८,८०० रुपये किमतीची अमेरिकन टुरिस्टर कोलोराडो बॅग मोफत मिळेल*.

**सर्व किमती, ऑफर्स, डिस्काउंट, कॅशबॅक, एक्सचेंज बोनस आणि इतर लाभ हे लागू असलेल्या अटी व शर्तींच्या अधीन आहेत. तसेच ही उत्पादने, मॉडेल, स्टोअर, शहर आणि उपलब्धतेनुसार बदलू शकतात.

Comments are closed.