- खेडलेझुंगे व कानळद बंधाऱ्यांचाही समावेश
** एनजीएन न्यूज नेटवर्क
निफाड : तालुक्यातील गोदावरी नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या जुन्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला राज्य शासनाने मंजुरी दिल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विधान परिषद आमदार विवेक भैय्या कोल्हे यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जलसंपदा विभागास आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
या मंजुरीमध्ये कोपरगाव परिसरासह निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे आणि कानळद येथील कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचाही समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची मागणी मा. जिल्हा परिषद सदस्या आर्कि. अमृता पवार यांनी आमदार विवेक भैय्या कोल्हे यांच्याकडे केली होती. सदर बंधाऱ्यांच्या दुरुस्तीमुळे परिसरातील भूजलपातळी वाढण्यास, सिंचन व्यवस्थेला बळकटी मिळण्यास तसेच उन्हाळ्यातील पाणीटंचाई कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. याचा थेट लाभ शेतकरी, ग्रामस्थ आणि कृषी क्षेत्राला होणार असून जलस्रोतांचे संवर्धन अधिक प्रभावीपणे होईल.
निफाड तालुक्यातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार विवेकभैय्या कोल्हे आणि आर्कि. अमृता पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल समाधान व कृतज्ञता व्यक्त केली आहे. या कामांमुळे परिसरातील जलव्यवस्थापन अधिक सक्षम होऊन शेतीला दीर्घकालीन दिलासा मिळेल.
Comments are closed.