NGN News
Latest Marathi News

सुमीत इंडस्ट्रीज मोठी घोषणा! 199.75 कोटींचा राइट्स इश्यू

कर्जफेड आणि सौर प्रकल्पासाठी निधी उभारणार

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

एकात्मिक पॉलिस्टर उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी सुमीत इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या व्यवसाय विस्तार आणि आर्थिक बळकटीसाठी 199.75 कोटींच्या इश्यूची घोषणा केली आहे. कंपनीने पात्र भागधारकांसाठी हा इश्यू आणला असून त्यातून उभारण्यात येणारा निधी उत्पादन क्षमता वाढ, कर्ज कमी करणे, कार्यकारी भांडवल मजबूत करणे आणि सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी वापरण्यात येणार आहे.कंपनीच्या संचालक मंडळाने 16.84 कोटी पूर्णतः भरलेल्या इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून 199.75 कोटी उभारण्यास मंजुरी दिली आहे. या इश्यूद्वारे कंपनीची आर्थिक लवचिकता वाढविणे आणि दीर्घकालीन वाढीच्या योजनांना गती देणे हा मुख्य उद्देश आहे.

सुरतस्थित सुमीत इंडस्ट्रीज लिमिटेडने इश्यूचा आकार 199.75 कोटी रुपये आहे. या इश्यूअंतर्गत 16.84 कोटी इक्विटी शेअर्स 11.86 रुपये प्रति शेअर या किमतीने ऑफर करण्यात येत आहेत. प्रत्येक 25 विद्यमान शेअर्समागे 8 राइट्स शेअर्स देण्यात येणार असून रेकॉर्ड डेट 12 जून 2026 निश्चित करण्यात आली आहे. हा इश्यू 22 जून 2026 रोजी खुला झाला असून 20 जुलै 2026 रोजी बंद होणार आहे. हक्क हस्तांतरणाची अंतिम तारीख 15 जुलै 2026 आहे.

राइट्स इश्यूमधून उभारण्यात येणाऱ्या निधीपैकी 49 कोटी रुपये नकोडा लिमिटेडकडून अधिग्रहित करण्यात आलेल्या 1.40 लाख टन प्रतिवर्ष क्षमतेच्या पॉलिस्टर चिप्स प्लांटच्या कार्यान्वयनासाठी वापरण्यात येणार आहेत. सुरत, गुजरात येथे असलेल्या या प्रकल्पासाठी एकूण 90 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून उर्वरित 41 कोटी रुपये कंपनी अंतर्गत स्त्रोतांमधून उभारणार आहे. आर्थिक वर्ष 2027-28 च्या पहिल्या तिमाहीत हा प्रकल्प सुरू होण्याची अपेक्षा असून त्यामुळे कंपनीचे बॅकवर्ड इंटिग्रेशन अधिक मजबूत होईल आणि पॉलिस्टर उत्पादन व्यवसायाला चालना मिळेल.

राइट्स इश्यूमधून मिळणाऱ्या अंदाजे 194.90 कोटी रुपयांच्या निव्वळ निधीचा सर्वाधिक हिस्सा कार्यकारी भांडवलासाठी राखून ठेवण्यात आला आहे. यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून वाढत्या उत्पादनासाठी आवश्यक कच्च्या मालाची खरेदी आणि दैनंदिन व्यवसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. याशिवाय नकोडा मालमत्तेच्या एकत्रीकरणासाठी 49.90 कोटी रुपये, कर्जफेडीसाठी 23 कोटी रुपये आणि 6.5 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 22 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

कंपनी 23 कोटी रुपयांच्या कर्जाची आगाऊ परतफेड करणार असून त्यामुळे व्याजाचा खर्च कमी होण्यास मदत होईल. परिणामी कंपनीची बॅलन्स शीट अधिक मजबूत होईल आणि भविष्यातील विस्तारासाठी आर्थिक क्षमता वाढेल. त्याचबरोबर ऊर्जा खर्च कमी करण्यासाठी आणि ऊर्जा सुरक्षेला बळकटी देण्यासाठी कंपनी 22 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून 6.5 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पामुळे वीज खर्चात बचत होऊन उत्पादन खर्चावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे.

कंपनीने राइट्स इश्यूमधून उभारलेल्या निधीचा वापर चार प्रमुख धोरणात्मक उद्दिष्टांसाठी करण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये उत्पादन क्षमता विस्तार, अधिग्रहित मालमत्तेचे एकत्रीकरण, कर्ज कमी करून आर्थिक स्थिती मजबूत करणे आणि ऊर्जा सुरक्षेसाठी अक्षय ऊर्जेचा वापर वाढवणे यांचा समावेश आहे. कंपनीच्या मते, या गुंतवणुकीमुळे कार्यक्षमतेत वाढ, उत्पादन क्षमतेचा विस्तार आणि दीर्घकालीन शाश्वत विकास साध्य करण्यास मदत होईल.

सन 1988 मध्ये स्थापन झालेली सुमीत इंडस्ट्रीज लिमिटेड ही सुरतस्थित एकात्मिक पॉलिस्टर उत्पादक कंपनी आहे. कंपनी पीईटी चिप्स, पीओवाय, एफडीवाय आणि पॉलिस्टर टेक्स्चराइज्ड यार्नचे उत्पादन करते. 16 जुलै 2024 रोजी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार कंपनीचा ताबा ईगल ग्रुपने घेतला. ईगल ग्रुपचे प्रवर्तक वस्त्रोद्योग क्षेत्रातील 40 वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ मानले जातात.

दरम्यान, कंपनीच्या संचालक मंडळाने पॉलिस्टर यार्न क्षमतेच्या विस्ताराच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. याअंतर्गत 15,000 टन प्रतिवर्ष अतिरिक्त उत्पादन क्षमता उभारण्यासाठी 30 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या विस्तारामुळे मूल्यवर्धित सिंथेटिक यार्न विभागात कंपनीची उपस्थिती आणखी मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.अक्षय ऊर्जेकडे कंपनीचा वाढता कल सुमीत इंडस्ट्रीजने यापूर्वीच हाय ऊर्जा टेक्नो एल एल पी या 14 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पात 27 टक्के हिस्सा घेतला आहे. कंपनी सध्या सौर आणि पवन ऊर्जेच्या विविध पर्यायांचाही अभ्यास करत आहे.

आर्थिक कामगिरी मजबूत आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये सुमीत इंडस्ट्रीजने 1,053.81 कोटी रुपयांचा महसूल,  60.77 कोटी रुपये इबिटा आणि 27.33 कोटी रुपये निव्वळ नफा नोंदवला आहे. राइट्स इश्यूद्वारे उभारण्यात येणारा निधी उत्पादन क्षमता वाढ, कार्यकारी भांडवल, कर्ज कमी करणे आणि ऊर्जा खर्चात बचत यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल आणि त्यामुळे पुढील काही वर्षांत कंपनीच्या वाढीला नवी गती मिळेल, असा कंपनीने विश्वास व्यक्त केला आहे.

Comments are closed.