
- चेंबरच्या नवनिर्वाचित सदस्यांचा निमातर्फे सत्कार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : उद्योग-व्यापारसह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन(निमा) आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर यांच्यातर्फे संयुक्तरित्या व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षापदी निवड झाल्याबद्दल सुनिता फाल्गुने, वेदांशू पाटील यांची व्यवस्थापन समिती सदस्य आणि त्यांच्या नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्यांचा निमा अध्यक्ष आशिष नहार व कार्यकारिणीतर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी एकत्र विकास कार्य करण्याची घोषणा करण्यात आली.
नाशकात उद्योजक, व्यावसायिक आणि कामगार यांच्यात सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे,औद्योगिकसह कृषी मालाच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळावे,दळणवळणाच्या चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी संयुक्तरित्या प्रयत्न करूया असे निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी आपल्या मनोगतात सांगितले, तर निमा ही नाशिक जिल्ह्याची अग्रगण्य औद्योगिक संस्था असून या संस्थेचे आम्हाला सहकार्य लागेल आणि आम्हाला ते निश्चितच मिळेल,असा विश्वास नवनिर्वाचित उपाध्यक्ष सुनिता फाल्गुने यांनी सत्कारास उत्तर देताना सांगितले.
निमा आणि महाराष्ट्र चैम्बर या दोन्ही प्रमुख संस्था असून नाशिकच्या विकासासाठी एकत्र काम करण्याची मोठी जबाबदारी नवीन पदाधिकाऱ्यांवर असल्याचे चेंबरचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले.
कार्यक्रमास निमाचे अध्यक्ष आशिष नहार,उपाध्यक्ष किशोर राठी,मनिष रावल, सचिव राजेंद्र अहिरे,कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे,किरण पाटील,चेंबरचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, सुधीर बडगुजर,विरल ठक्कर,राजेंद्र कोठावदे,कैलास पाटील,रवींद्र झोपे,गोविंद बोरसे, प्रफुल्ल संचेती, दीपाली चांडक, संदीप सोमवंशी, मिथिला कापडणीस, जयश्री कुलकर्णी, महेंद्र बच्छाव, जयंत जोगळेकर, कैलास आहेर,आशुतोष गायकवाड,वासुदेव भगत, राजेश सिंघल, सचिन कंकरेज, किरण वाजे, शशी नवले, नितीन आव्हाड, रवी पुंडे, अनिल मंत्री, दिलीप पिंगळे,वृंदा रावल, आदिती निरगुळे, प्रकाश गुंजाळ, शरद टरले,एन.टी. गाजरे यांच्यासह उद्योजक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.