
- या ऑर्डरमध्ये पुणे मेट्रो विस्तार प्रकल्पासाठी अत्याधुनिक प्रोपल्शन सिस्टीम्स तसेच ट्रेन कंट्रोल अँड मॉनिटरिंग सिस्टीम (टीसीएमएस) चा समावेश आहे.
- महाराष्ट्रातील प्रादेशिक उत्पादन सुविधांद्वारे उत्पादन करण्यात येणार असल्याने हा प्रकल्प ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ करतो.
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सीमेन्स लिमिटेड ला टिटागढ रेल सिस्टिम्स लिमिटेडकडून पुणे मेट्रो रेल्वे विस्तार प्रकल्पासाठी अत्याधुनिक प्रोपल्शन प्रणाली आणि ट्रेन कंट्रोल अँड मॉनिटरिंग सिस्टीम (टीसीएमएस) पुरविण्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. या कंत्राटाअंतर्गत 12 मेट्रो ट्रेनसेट्ससाठी ट्रॅक्शन कन्व्हर्टर्स, ऑक्झिलरी कन्व्हर्टर्स, ट्रॅक्शन मोटर्स आणि टीसीएमएस यांचे डिझाइन, उत्पादन, पुरवठा तसेच वॉरंटी सेवा पुरविण्याची जबाबदारी सीमेन्स लिमिटेडकडे सोपविण्यात आली आहे. या अत्याधुनिक प्रणालींमुळे पुणे मेट्रोच्या विस्तार प्रकल्पातील रेल्वे सेवांची कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि सुरक्षितता अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.
सीमेन्स लिमिटेडच्या मोबिलिटी बिझनेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राजीव जोईसर म्हणाले, “पुणे मेट्रो प्रकल्पासाठी टिटागढ रेल सिस्टिम्स लिमिटेडसोबत भागीदारी करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. भारतातील वेगाने विस्तारत असलेल्या मेट्रो क्षेत्रासाठी अत्याधुनिक प्रोपल्शन आणि ट्रेन कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टम (टीसीएमएस) तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. भारतामध्ये शाश्वत शहरी वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असताना, मजबूत स्थानिक उत्पादन आणि तंत्रज्ञान परिसंस्थेची उभारणी अधिक महत्त्वाची ठरत आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी सुसंगत राहून, सीमेन्सच्या भारतातील भक्कम उत्पादन आणि अभियांत्रिकी क्षमतांचा लाभ घेत आम्ही ही प्रगत तंत्रज्ञाने देशात विकसित करण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
टिटागढ रेल सिस्टिम्स लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उमेश चौधरी म्हणाले, “पुणे मेट्रो प्रकल्पासाठी सीमेन्ससोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. ही भागीदारी ‘मेक इन इंडिया’ या आमच्या दृढ वचनबद्धतेला अधिक बळकटी देते आणि जवळपास पूर्ण स्थानिकीकरणाच्या दिशेने आमच्या प्रयत्नांना पुढे नेते. पुणे मेट्रोचे आमच्यासाठी नेहमीच एक विशेष स्थान राहिले आहे, कारण याच प्रकल्पातून टिटागढने प्रवासी रेल्वे प्रणाली क्षेत्रात प्रवेश केला आणि भारतातील पहिल्या अॅल्युमिनियम बॉडी असलेल्या मेट्रो कोचेसची सुरुवात झाली. या अतिरिक्त पर्यायी करारामुळे देशातील अॅल्युमिनियम-आधारित मेट्रो आणि रेल्वेगाडी परिसंस्थेला आणखी चालना मिळणार आहे. सीमेन्स आणि टिटागढ रेल सिस्टिम्स लिमिटेड यांच्यातील हे सहकार्य देशातील शहरी वाहतूक क्षेत्रातील स्वदेशीकरणाच्या प्रक्रियेला गती देणारे ठरेल. तसेच, भारतीय शहरी गतिशीलता क्षेत्रात दोन्ही कंपन्यांमधील दीर्घकालीन आणि व्यापक भागीदारीची ही एक भक्कम सुरुवात असल्याचा आम्हाला विश्वास आहे.”
Comments are closed.