NGN News
Latest Marathi News

ओझर येथील भूमीदाता जिजाबाई दहाडदे यांचे निधन

ओझर : एनजीएन न्यूज नेटवर्क

ओझर येथील भूमिदाता, धर्मपरायण व दातृत्वशील व्यक्तिमत्त्व जिजाबाई भागुजी दहाडदे (वय ९५) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

     जिजाबाई दहाडदे या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या.त्यांचे संपूर्ण जीवन अध्यात्माला समर्पित होते. त्यांनी आयुष्यभर विविध सामाजिक व धार्मिक कार्यात सहभाग घेत अनेक ठिकाणी दानधर्म केला. ओझर येथील जनार्दन स्वामी महाराज आश्रमासाठी  त्यांनी केलेले भूमीदान हे त्यांच्या उदात्त दातृत्वाचे जिवंत उदाहरण आहे.जिजाबाई दहाडदे यांचा साधेपणा, धार्मिकता आणि परोपकाराची वृत्ती ही पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. त्यांच्या कार्याची आठवण समाजात दीर्घकाळ जिवंत राहील.त्यांच्या निधनाने ओझर परिसरात शोककळा पसरली असून एक दानशूर, साधी व अध्यात्मिक व्यक्तीमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.त्यांच्या अंत्ययात्रेस जगदगुरु जनार्दन स्वामी आश्रमाचे संत स्वामी परमेश्वरगिरीजी महाराज, हृदयानंद माऊली यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, जय बाबाजी भक्त परिवारातील सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.