NGN News
Latest Marathi News

लासलगाव केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी गणेश फड

** एनजीएन न्यूज नेटवर्क

लासलगाव : राकेश बोरा

लासलगाव केमिस्ट असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत पुढील तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी गणेश फड, उपाध्यक्षपदी संदीप ठोंबरे, सचिवपदी शेखर सोनवणे तर खजिनदारपदी सौरभ भंडारी यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणीच्या इतर सदस्यांचीही निवड यावेळी सर्वानुमते करण्यात आली.

या बैठकीस असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य शामराव आहेर , संतोष डागा, नितीन नाहटा यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. ज्येष्ठ सदस्यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन करत संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक सूचना केल्या.

नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षपदी गणेश फड, उपाध्यक्षपदी संदीप ठोंबरे, सचिवपदी शेखर सोनवणे आणि खजिनदारपदी सौरभ भंडारी यांची निवड झाल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.