
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सकाळी पेपर विकत घेण्यापासून ते महिन्याच्या घरभाड्यापर्यंत, आजकल सगळंच ऑनलाईन भरता येतं. मग अशातच अॅपची बदलाबदली, अनेक आयडी मुळे उडणारी धांदल आणि विविध प्लॅटफॉर्म्सवरील छुपेशुल्क हे आजही चालूच आहे. हा गोंधळ संपवण्यासाठी एमबँक ने थेट स्वतःचं यूपीआय हॅन्डल @एमबँक सुरू केलं आहे.आज बहुतांश फिनटेक कंपन्या आणि बऱ्याच सहकारी बँका इतर बँकांच्या नावावर चालणाऱ्या यूपीआय हॅन्डल्सवर अवलंबून आहेत. मात्र एमबँक ने हा साचा मोडत स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. स्वतःचं यूपीआय हॅन्डल सुरू करणारी ही देशातील एकमेव नॉन-शेड्यूल्ड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ठरली आहे.आता चहाचे पैसे असोत, भाजीवाल्याचं बिल, मित्रांना पैसे पाठवणं किंवा महिन्याचा किराणा. सगळ्या व्यवहारांसाठी आता एकच, लक्षात राहणारं आणि थेट एमबँक बँकेचं हँडल वापरता येणार आहे.
“लोकांना यूपीआय वापरायला आवडतं, पण गोंधळ नको असतो. त्यांना हवं असतं सरळ, सोपं आणि विश्वासार्ह व्यवहाराचं साधन. @एमबँक अशाच सुरक्षित आणि सहज बँकिंगची हमी देते” एमबँक चे अध्यक्ष श्री. तन्वीर इनामदार म्हणाले. @एमबँक हॅन्डल सर्व यूपीआय अॅप्सवर सहज वापरता येते. वैयक्तिक आणि व्यावसायिक व्यवहारांसाठी पटकन ओळखू येणारं हॅन्डल आणि बँकेचा थेट विश्वास हे या हॅन्डलचे प्रमुख फायदे ठरतील.
@एमबँक च्या येण्यानं डिजिटल बँकिंग अधिक सोप्पं, परिचयाचं आणि वैयक्तिक झालं आहे. डिजिटल व्यवहारांच्या बाबतीत जगाचं लक्ष भारताकडे असताना, यात आपला हातभार लावत एमबँक आपल्या ग्राहकांना वेगवान, विश्वासार्ह आणि आधुनिक सेवा देऊन आपली अशी एक खास ओळख निर्माण करत आहे.
@एमबँक यूपीआय हॅन्डल आता सर्व एमबँक ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. एमबँक चं हे पाऊल डिजिटल बँकिंगची नाळ सामान्य जनतेच्या रोजच्या गरजांशी जोडणारं असेल.
Comments are closed.