- २०२५ या वर्षातील आलेख; तज्ज्ञ टीमचा मोलाचा वाटा
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथील ऑर्थोपेडिक विभागाने २०२५ या वर्षात तब्बल १००० यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण करत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या उल्लेखनीय कामगिरीनिमित्त हॉस्पिटलतर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या यशामध्ये ऑर्थोपेडिक सर्जन्स डॉ. सागर काकतकर, डॉ. जयेश सोनजे, डॉ. श्रीकांत जाधव आणि डॉ. राहुल सुपे यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ टीमचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया, अचूक निदान, रुग्ण-केंद्रित दृष्टिकोन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हा टप्पा गाठणे शक्य झाले आहे.
या १००० शस्त्रक्रियांमध्ये गुडघा व खुबा प्रत्यारोपण (Joint Replacement), लिगामेंट पुनर्बांधणी (Ligament Reconstruction), फ्रॅक्चर व्यवस्थापन, आर्थ्रोस्कोपी तसेच इतर जटिल हाड व सांध्यांच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. तसेच, अत्याधुनिक रोबोटिक सर्जरी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काही गुडघा व सांध्यांच्या शस्त्रक्रिया अधिक अचूकतेने पार पाडण्यात आल्या. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेतील नेमकेपणा वाढतो, इम्प्लांटचे अचूक पोझिशनिंग करता येते, रक्तस्राव कमी होतो आणि रुग्णांचा पुनर्वसन कालावधी अधिक जलद होण्यास मदत होते. मिनिमली इन्वेसिव्ह तंत्रज्ञान, आधुनिक ऑपरेशन थिएटर सुविधा आणि अनुभवी भूलतज्ञ व नर्सिंग स्टाफ यांच्या समन्वयातून रुग्णांना सुरक्षित आणि परिणामकारक उपचार देण्यात आले.
या कार्यक्रमात बोलताना डॉ. सागर काकतकर म्हणाले,
“१००० शस्त्रक्रियांचा हा टप्पा आमच्या संपूर्ण टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे. आधुनिक तंत्रज्ञानासह, विशेषतः रोबोटिक सर्जरीमुळे रुग्णांना अधिक अचूक आणि सुरक्षित उपचार देणे शक्य झाले आहे. प्रत्येक रुग्णाच्या विश्वासाला पात्र ठरणे आणि त्यांना वेदनामुक्त जीवन देणे हेच आमचे ध्येय आहे.”
डॉ. जयेश सोनजे यांनी सांगितले,
“आधुनिक व रोबोटिक तंत्रज्ञान आणि अचूक नियोजनाच्या मदतीने गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही यशस्वीपणे पार पाडता येतात. रुग्णांचे जलद पुनर्वसन आणि त्यांचे समाधान हे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.”
डॉ. श्रीकांत जाधव यांनी नमूद केले,
“हाड व सांध्यांच्या आजारांमध्ये योग्य वेळी उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. अत्याधुनिक सुविधा आणि टीमवर्कमुळे आम्ही सर्वोत्तम दर्जाची सेवा देऊ शकलो.”
डॉ. राहुल सुपे यांनी सांगितले,
“या १००० शस्त्रक्रिया म्हणजे केवळ एक आकडा नसून, १००० कुटुंबांच्या चेहऱ्यावर परतलेले हास्य आहे. भविष्यातही अधिक प्रगत, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित उपचार देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
याप्रसंगी बोलताना हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख श्री. अनुप त्रिपाठी यांनी सांगितले की,
“अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, रोबोटिक सर्जरी सुविधा, कुशल डॉक्टरांची टीम आणि रुग्ण-केंद्रित सेवा यामुळे नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांचा विश्वास सतत वाढत आहे. १००० यशस्वी ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.”
या यशामुळे अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया क्षेत्रात, विशेषतः रोबोटिक सर्जरीच्या माध्यमातून, आपली भक्कम ओळख निर्माण केली असून, महाराष्ट्रातील सर्वात मोठे ऑर्थोपेडिक अनुभवी डिपार्टमेंट नाशिक येथे आहे,तसेच भविष्यातही उत्कृष्ट, सुरक्षित आणि जागतिक दर्जाच्या सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
Comments are closed.