NGN News
Latest Marathi News

चाटोरी येथे ५३४ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी 

कै. बाळासाहेब (भाऊ) वाघ यांच्या स्मृती प्रित्यर्थ अकरावे शिबिर संपन्न

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

 के के वाघ शिक्षण संस्था, नाशिक, के के वाघ फाऊंडेशन, श्री. बाळासाहेब वाघ वेल्फेअर फाऊंडेशन, स्माईल व स्पिनॅच यांचे संयुक्त विद्यमाने आदरणीय कै. बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ यांच्या स्मृती प्रित्यर्थ रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेदरम्यान ज्ञानगोदावरी सार्वजनिक वाचनालय, चाटोरी ता.निफाड येथे अकरावे मोफत नेत्र, हृदय व महिला आरोग्य तपासणी शिबीर उत्साहत पार पडले. 

यावेळी एकूण ५३४  नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये नेत्र तपासणी- २५०, हृदय तपासणी- १८८, महिला तपासणी ९५ अशा एकूण  ५३४ नागरिकांनी विविध  तपासण्या केल्या. शिबिराकरता मणिशंकर आय हॉस्पिटल,  नाशिक येथील डॉ. रघुनाथ खांडबहाले, डॉ.मंजुषा चव्हाण, मोहिनी गायकवाड, आत्माराम चौधरी, अभिजीत ताजणे व रेखा पाटील, श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटचे डॉ.कुणाल निकम, डॉ. राहुल नाईक व कल्पेश वाळके तसेच नामको हॉस्पिटलचे डॉ. शिवाजी बच्छाव, डॉ. गणेश पाटील, डॉ. भूमिका जाधव, डॉ. गीता शेजवळ, डॉ. रोशनी गायकवाड, डॉ.वनिता जाधव  या तीनही रुग्नालयाच्या टीमने उपस्थित रुग्णांची तपासणी केली. 

शिबिराचे उद्घाटन व दिप प्रज्वलन प्रसंगी संस्थेचे जनसंपर्क संचालक मा. अजिंक्य बाळासाहेब वाघ, तंटामुक्तीचे अध्यक्ष रघुनाथ हिरे, सोसायटी चेअरमन सदाशिव खेलुकर, सरपंच सविता डमाळे, उपसरपंच राहुल गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य दिलीपराव कदम, अध्यक्ष स्कूल कमिटी गणेश खेलुकर, पांडुरंग मुरादे, महेश खेलूकर, संजय केळकर, सुनील हांडगे, अशोक डमाळे, शिवराज हांडगे, रामदास ढोमसे, नंदू घोलप संतोष शिरसाठ, अमोल गांगुर्डे व संतू पाटील हिरे आदी उपस्थित होते. 

शिबिरासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. समीर बाळासाहेब वाघ, सचिव प्रा. के.एस.बंदी, समन्वयक डॉ व्ही. एम. सेवलीकर, समन्वयक डॉ. एन. एस. पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

शिबीर यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ.माधव देवरे, मुख्याध्यापिका वंदना पवार, मुख्याध्यापक दिनकर शेजवळ, उज्ज्वला तासकर, मुख्याध्यापक बाळासाहेब मोंढे, प्राचार्य डॉ वैभव भामरे, किरण वाघ व  शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा.प्रविण आहेर यांनी केले.

Comments are closed.