NGN News
Latest Marathi News

साप्रा यांच्याकडून स्‍ट्रीट फूडमधील कूकिंग ऑईल्‍सच्‍या भूमिकेचे स्‍पष्‍टीकरण

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

कुरकुरीत भजीपासून स्‍वादिष्‍ट समोसापर्यंत भारतीयांना स्‍ट्रीट फूड खूप आवडतात. पण, प्रत्‍येक तळलेल्‍या स्‍नॅकमागे तेलाचे न दिसण्‍यात आलेले महत्त्व असते, ज्‍यामुळे खाद्यपदार्थ स्‍वादिष्‍ट होतात. पॉडकास्‍ट सिरीजमध्‍ये कलनरी एक्‍स्‍प्‍लोरर आणि दिल्‍ली फूड वॉक्‍सचे संस्‍थापक अनुभव साप्रा यांनी स्‍ट्रीट फूडमध्‍ये वापरल्या जाणाऱ्या कूकिंग ऑईल्‍सच्‍या भूमिकेचे सहजपणे स्‍पष्‍टीकरण केले आहे, तसेच दिशाभूल करणाऱ्या फूड लेबल्‍सबाबत शंकांचे निरसन केले आहे.

एपिसोडचे पुनरावलोकन

पहिला एपिसोड ‘सायलेण्‍ट हिरो: द सायन्‍स ऑफ व्‍हॉट वी इट’मध्‍ये अनुभव विक्रेते पाम तेलाचा अधिक वापर करण्‍यामागील कारण स्‍पष्‍ट करतात. पाम तेलाची उच्‍च तापमानामध्‍ये स्थिरता, तटस्‍थ स्‍वाद आणि सतत तळण्‍याची क्षमता भारतीय स्‍नॅक्‍सना कुरकुरीतपणा आणण्‍यास मदत करतात.

पुढील एपिसोड ‘नो पाम ऑईल? डोण्‍ट बी फूल’मध्‍ये ते ‘नो पाम ऑईल’ लेबल्‍सचे वाढते प्रमाण आणि या टॅग्‍समुळे आरोग्‍याबाबत दिशाभूल करणारे समज निर्माण होण्‍यााबाबत चर्चा करतात. अनुभव खरेदीदारांना पॅकेटच्‍या पृष्‍ठभागांवर असलेल्‍या दाव्‍यांवर अवलंबून न राहता संपूर्ण साहित्‍याची यादी आणि पोषणाबाबत तथ्‍ये वाचण्‍याचे आवाहन करतात. 

प्रभावकाची माहिती

·         दोन्‍ही एपिसोड्समध्‍ये अनुभव निदर्शनास आणतात:

·         रस्‍त्‍यावरील विक्रेते उच्‍च तापमानामध्‍ये स्थिर राहणाऱ्या आणि उच्‍च स्‍मोक पॉइण्‍ट असण्‍यासोबत सहजपणे खराब न होणाऱ्या तेलांना प्राधान्‍य देतात.

·         पाम तेलाची तटस्‍थ चव फ्लेवर्स कायम ठेवते.

·         अनेक ग्राहकांना माहित नाही की पाम तेल नैसर्गिकरित्‍या ट्रान्‍स-फॅट मुक्‍त आणि कोलेस्‍ट्रॉल-मुक्‍त आहे.

·         सुरक्षित कूकिंग पद्धती अवलंबणे महत्त्वाचे आहे: ताजे तेल वापरा, तेल अधिक गरम करणे टाळा आणि घरामध्‍ये तेल बदलत राहा. 

पाम तेलाबाबत विज्ञानाचे मत

पाम तेल नैसर्गिकरित्‍या कोलेस्‍ट्रॉल-मुक्‍त आहे, जेथे कोलेस्‍ट्रॉल फक्‍त मांस-आधारित फॅट्समध्‍ये आढळून येते. संतुलित आहाराचा भाग म्‍हणून सेवन केल्‍यास पाम तेलाचा रक्‍तातील कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांवर तटस्‍थ प्रभाव पडतो. पाम तेलामध्‍ये टोकोट्रिएनॉल्‍स सारखी व्हिटॅमिन ई संयुगे देखील असतात, जी त्‍यांच्‍या प्रबळ अॅण्‍टीऑक्सिडण्‍ट्स गुणधर्मांसाठी ओळखली जातात आणि पेशी व कार्डियोव्‍हॅस्‍कुलर आरोग्‍य उत्तम राखण्‍यास मदत करतात.

आयसीएमआर आहारसंबंधित मार्गदर्शकतत्त्वांशी संलग्‍न

आयसीएमआर-एनआयएन २०२४ मार्गदर्शकतत्त्वांनुसार दररोज फॅट्स व एसेन्शियल फॅटी अॅसिड्स (ईएफए)ची पूर्तता करण्‍यासाठी तेल/फॅट्स योग्‍य प्रमाणात वापरण्‍याची आणि विविध प्रकारच्‍या तेलबिया, नट्स, न्‍यूट्रिसेरेल्‍स व शेंगाचा वापर करण्‍याची शिफारस केली जाते.

एनएमईओ-ओपी: भारताची खाद्यतेल ध्‍येये

अनुभव खाद्यतेल परिसंस्‍था प्रबळ करण्‍याप्रती भारताच्‍या व्‍यापक प्रयत्‍नांना देखील निदर्शनास आणतात. भारताच्‍या नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑईल्‍स – ऑईल पाम (एनएमईओ-ओपी)चा ऑईल पाम क्षेत्र २०२५-२६ पर्यंत अतिरिक्‍त ६.५ लाख हेक्‍टरपर्यंत वाढवण्‍याचा, तसेच २०२९-३० पर्यंत १६.७१ लाख हेक्‍टरपर्यंत वाढवण्‍याचा मनसुबा आहे, जेथे ईशान्‍यकडील राज्‍यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्‍यात येईल आणि पाम तेल आयात करण्‍यावरील अवलंबन कमी होईल.

‘नो पाम ऑईल’ लेबल्‍सबाबत माहिती

आयएफबीए व ओटीएआय सारख्‍या उद्योग संस्‍थांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे की, हे लेबल्‍स पौष्टिक मूल्‍याला सादर न करता मार्केटिंगसाठी वापरले जातात. ग्राहकांना पोषणाबाबत सर्व घटक जसे साखर, मीठ आणि एकूण फॅटचे प्रमाण पाहण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे. रस्‍त्‍यावरील विक्रेत्‍यांच्‍या गाथा आणि अन्‍न विज्ञानाच्‍या माध्‍यमातून हे एपिसोड्स श्रोत्‍यांना महत्त्वपूर्ण माहितीवर लक्ष केंद्रित करण्‍यास आणि आहारसंबंधित योग्‍य निवड करण्‍यास मदत करतात.        

Comments are closed.