NGN News
Latest Marathi News

साक्षी लालवानी यांच्याकडून पामतेल, लेबल्‍स, दैनंदिन पोषणाबाबत मिथकांचे निराकरण 

नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क

कोणते कूकिंग ऑईल आरोग्‍यदायी आहे याबाबत वाढता गोंधळ पाहता सुरू असलेल्‍या पॉडकास्‍ट सिरीजचा भारतातील कुटुंबांना माहितीपूर्ण, विज्ञान-आधारित पर्यायांची निवड करण्‍यास मदत करण्‍याचा मनसुबा आहे. या सिरीजच्‍या एका एपिसोडमध्‍ये न्‍यूट्रिशनिस्‍ट साक्षी लालवानी यांनी निवडले जाणारे कूकिंग ऑईल, लेबल वाचन आणि सुरक्षित कूकिंग पद्धतींबाबत दैनंदिन समस्‍यांचे स्‍पष्‍टीकरण केले आहे. एपिसोड्समध्‍ये फूडशी संबंधित चर्चा करण्‍यात येते, तसेच फॅट्स, पोषण आणि भारतातील किचनमध्‍ये पाम तेलाची महत्त्वपूर्ण भूमिका याबाबत पुरावा-आधारित माहिती सांगण्‍यात येते.

एपिसोडचे मुख्‍य आकर्षण

पहिल्‍या एपिसोडमध्‍ये साक्षी पाम तेलाबाबत मुलभूत माहिती सांगतात. पाम तेल हे ऑईल पाम झाडाच्‍या फळामधून काढले जाणारे वनस्‍पतीजन्‍य तेल आहे. त्‍या स्‍पष्‍टीकरण करतात की पाम तेल नैसर्गिकदृष्‍ट्या ट्रान्‍स-फॅट मुक्‍त आहे, तसेच उच्‍च तापमानामध्‍ये स्थिर राहते. पाम तेलामध्‍ये व्हिटॅमिन ई टोकोट्रिएनॉल्‍स असते आणि लाल पाम तेलामध्‍ये प्रोव्हिटॅमिनचा स्रोत बीटा-कैरोटिन असते. त्‍या पाम तेलामधील संतुलित फॅटी अॅसिड मिश्रणाला (जवळपास ५० टक्‍के सॅच्‍युरेटेड, ४० टक्‍के मोनोसॅच्‍युरेटेड व १० टक्‍के पॉलिसॅच्‍युरेटेड फॅट्स) निदर्शनास आणतात, तसेच स्‍पष्‍ट करतात की, एखाद्या तेलाचा वापर करणे न टाळता स्‍मार्ट कूकिंग सवयी आरोग्‍यदायी आहारासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

दुसऱ्या एपिसोडमध्‍ये, त्‍या ‘नो पाम ऑईल’ लेबल्‍सचे वाढते प्रमाण निदर्शनास आणतात आणि स्‍पष्‍ट करतात की या टॅग्‍सचे मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केले जात आहे, जे वास्‍तविक पौष्टिक मूल्‍य न सांगता आरोग्‍यदायी असण्‍याचा दावा निर्माण करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. त्‍या श्रोत्‍यांना पॅकेजिंगच्‍या वरील बाजूस असलेल्‍या लेबल्‍सव्‍यतिरिक्‍त घटकांची यादी पाहण्‍याचा आणि पाम तेलाऐवजी कोणत्‍या तेलांचा वापर केला जातो, हे समजून घेण्‍याचा सल्‍ला देतात. 

पाम तेलाबाबत विज्ञानाचे मत

या सिरीजमधून निदर्शनास येते की, संतुलित आहाराचा भाग म्‍हणून वापरण्‍यात येणाऱ्या पाम तेलामध्‍ये टोकोट्रिएनॉल्‍स व कॅरोटेनॉइड्स यासाखी गुणकारी संयुगे संपन्‍न प्रमाणात असतात (लाल पाम तेलात). ही संयुगे उत्तम अॅण्‍टीऑक्सिडण्‍ट्स आहेत. फूड सायन्‍स (अन्‍न विज्ञान) निदर्शनास आणते की पाम तेल उच्‍च तापमानामध्‍ये स्थिर राहते, ऑक्सिडेशनला विरोध करते, स्‍वाद कायम ठेवते, दीर्घकाळापर्यंत टिकते, इतर वनस्‍पती तेलांच्‍या तुलनेत घातक संयुगे निर्माण होण्‍याची शक्‍यता फार कमी असते. तसेच पाम तेल नैसर्गिकरित्‍या ट्रान्‍स-फॅट मुक्‍त असते आणि अंशत: हायड्रोजनेशन प्रक्रियेमधून जाण्‍याची गरज भासत नाही. याव्‍यतिरिक्‍त, फूडमध्‍ये तेल कमी प्रमाणात शोषले जाते, ज्‍यामुळे कुरकुरीत व समप्रमाणात तळलेले खाद्यपदार्थ मिळतात. 

आयसीएमआर आहारसंबंधित मार्गदर्शकतत्त्वांशी संलग्‍न

साक्षी आयसीएमआर-एनआयएन डाएटरी गाइडलान्‍स (२०२४)चे समर्थन करतात, जे प्रत्‍येक व्‍यक्‍तीने दररोज २५ ते ३० ग्रॅम फॅट्सचे सेवन मर्यादित ठेवण्‍याची आणि संतुलित फॅटी अ‍ॅसिड प्रोफाइल राखण्‍यासाठी विविध वनस्‍पती-आधारित तेलांमध्‍ये बदल करण्‍याची शिफारस करते. यासंदर्भात, पाम तेल भारतीयांच्‍या दैनंदिन कूकिंग पद्धतींसाठी अनुकूल असलेल्‍या विविध आरोग्‍यदायी पर्यायांपैकी एक आहे.

भारताच्‍या खाद्यतेल ध्‍येयांना पाठिंबा: एनएमईओ-ओपी

हे एपिसोड्स भारतातील विस्‍तृत खाद्यतेल गरजांना देखील निदर्शनास आणतात. भारत सरकारच्‍या नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑईल्‍स – ऑईल पाम (एनएमईओ-ओपी) अंतर्गत देशभरातील अनेक राज्‍यांमध्‍ये पाम तेल लागवडीचा विस्‍तार केला जात आहे. यामागील कारण म्‍हणजे पाम तेलाची उत्‍पादकता जास्‍त आहे, इतर अनेक तेलबिया पीकांच्‍या तुलनेत प्रति हेक्‍टर ५ ते ८ पट जास्‍त तेलाचे उत्‍पादन मिळते, ज्‍यामुळे पाम तेलाची देशांतर्गत उपलब्‍धता वाढण्‍यास मदत होईल आणि पाम तेल आयात करण्‍यावरील अवलंबन कमी होईल.

‘नो पाम ऑईल’ लेबल्‍सबाबत माहिती

चर्चेमध्‍ये आयएफबीए व ओटीएआय यांसारख्‍या उद्योग संस्‍थांनी नुकतेच सादर केलेल्‍या विधानांचा देखील समावेश आहे, ज्‍यांनी निदर्शनास आणले आहे की ‘नो पाम ऑईल’ क्‍लेम्‍स ग्राहकांची दिशाभूल करू शकतात. हे एपिसोड्स ग्राहकांना पॅकेजिंगच्‍या मुख्‍यपृष्‍ठावर असलेल्‍या दाव्‍यावर अवलंबून न राहता एकूण पोषक घटक, घटकांचा दर्जा यांना प्राधान्‍य देण्‍याचे आवाहन करतात.

पाचव्‍या एपिसोडची लिंक: https://www.instagram.com/p/DQx7TR7gZH6/

सहाव्‍या एपिसोडची लिंक: https://www.instagram.com/p/DRmZs1TgSH9/  

सिरीज बाबत

मलेशियन पाम ऑईल कौन्सिल (एमपीओसी)ची ही सहा एपिसोड्सची पॉडकास्‍ट सिरीज चुकीच्‍या माहितीचे निराकरण करण्‍यासाठी आणि पाम तेलाबाबत वैज्ञानिक तथ्‍ये सोप्‍या, विश्वसनीय पद्धतीने सांगण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. प्रत्‍येक एपिसोडमध्‍ये पोषण, आरोग्‍य व शाश्वतता यांसारख्‍या विषयांबाबत तज्ञांचे मत व दैनंदिन पैलू सादर करण्‍यात आले आहेत, ज्‍यामुळे श्रोत्‍यांचा मिथकांबाबत असलेला समज दूर करण्‍यास मदत होते. या चर्चांसह एमपीओसीला संतुलित, तथ्‍य-आधारित चर्चांना चालना देण्‍याची आणि वैविध्‍यपूर्ण, पौष्टिक व शाश्वतपणे उत्‍पादित करता येणारे खाद्यतेल म्‍हणून पाम तेलाचा योग्‍य दर्जा निदर्शनास आणण्‍याची आशा आहे.       

Comments are closed.