NGN News
Latest Marathi News

सोसायटी ऑफ मिडवाईफ इंडिया नाशिक चॅप्टर सेक्रेटरीपदी डॉ मातेरे

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

एसएमबीटी इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या डॉ. कविता मातेरे यांची सोसायटी ऑफ मिडवाईफ इंडियाच्या नाशिक चॅप्टरच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच गोखले एज्युकेशन सोसायटी येथे सोसायटी ऑफ मिडवाईफ इंडियाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सोसायटी ऑफ मिडवाईफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. प्रकाशअम्मा यांनी डॉ मातेरे यांची सेक्रेटरीपदी निवड केली. याप्रसंगी नाशिक विभागाच्या विविध ठिकाणाहून २०० हून अधिक परिचारिका उपस्थित होत्या.

यावेळी कार्यक्रमात डॉ प्रकाशअम्मा म्हणाल्या की, सोसायटी ऑफ मिडवाईफ इंडियाचे ब्रीदवाक्य सेफ मदरहूड म्हणजेच सुरक्षित मातृत्व असून, नाशिकमध्ये सुरू झालेल्या या चॅप्टरमुळे मातृ-आरोग्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले जाणार आहे. सोसायटी ऑफ मिडवाईफ इंडिया स्थापनेचा मुख्य उद्देश सुरक्षित प्रसूती व निरोगी मातृत्वाला प्रोत्साहन देणे हा आहे. गर्भवती महिलांचे आरोग्य, संतुलित आहार, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची काळजी, बाळाची निगा, पुराव्यावर आधारित उपचारपद्धती (Evidence-Based Practices) व संशोधन या महत्त्वाच्या क्षेत्रांत सोसायटीच्या माध्यमातून कार्य केले जाणार आहे.

सोसायटी ऑफ मिडवाईफ इंडियाच्या संपूर्ण भारतात २० शाखा आहेत. आता नाशिक विभागासाठी नाशिक चॅप्टरची स्थापना करण्यात आली असून उपजिल्हे, तालुके आणि जिल्हास्तरावर विविध स्किल ट्रेनिंग व जनजागृती मोहिमा राबविण्यात येणार आहेत. परिचारिका शिक्षणातील मिडवाईफरी हा महत्त्वाचा घटक असून जीएनएम आणि एएनएम नर्सेसना गुणवत्तापूर्ण मिडवाईफरी शिक्षण व स्किल ट्रेनिंग देणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. या माध्यमातून नर्सेस सुरक्षित मातृत्व धोरणे राबविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या नाशिक चॅप्टरच्या सेक्रेटरीपदी डॉ. मातेरे यांची निवड करण्यात आल्याने त्यांच्या दोन वर्षातील कार्यकाळात गर्भवती महिलांचे वाढलेले मृत्यूचे प्रमाण किंवा नवजात शिशूंचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी कार्य केले जनात आहे. दोन वर्षांच्या या कार्यकाळात त्या नर्सेससाठी स्किल ट्रेनिंग आयोजित करणे, गर्भवती मातांसाठी मार्गदर्शन करणे, शासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे व विविध उपक्रमांचे अहवाल हैदराबाद येथील मुख्यालयास सादर करणे या जबाबदाऱ्या पार पाडणार आहेत.

——-
@ सुरक्षित मातृत्व हे प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याचा पाया आहे. सोसायटी ऑफ मिडवाईफ इंडिया नाशिक चॅप्टरच्या माध्यमातून मी गर्भवती मातांसाठी अधिक सुरक्षित, सक्षम आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन.
डॉ. कविता मातेरे, प्राचार्या, एसएमबीटी इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग

Comments are closed.