- उलट्या, ताप, जुलाब तसेच अंगशिथिलपणामुळे घबराट; प्रकृती स्थिर
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
कळवण तालुक्यातील कनाशी आदिवासी आश्रम शाळेतील तब्बल ५१ विद्यार्थिनीना विषबाधा झाल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. या सर्वांमध्ये उलट्या, ताप, जुलाब तसेच अंगशिथिलपणा अशी लक्षणे दिसून आली. अन्नातील विषारी घटक अथवा दूषित पाण्यामुळे हा प्रकार झाल्याची शंका व्यक्त होत आहे. या विद्यार्थिनींवर दोन वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
विषबाधा झालेल्या ४७ विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. आश्रम शाळेतील अन्नपदार्थ तसेच पाणी यांचे नमुने घेवून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर कारवाईचे स्वरूप ठरणार आहे. कळवणचे आमदार नितीन पवार यांनी कनाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन विद्यार्थिनींची विचारपूस केली. आवश्यक औषधे व उपचार तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.
बुरशीयुक्त चिक्की कारणीभूत ?
या प्रकरणात आश्रम शाळेतील विद्यार्थिनीना देण्यात येणारी चिक्की बुरशीजन्य असल्याचे कारण पुढे आले आहे. तीळापासून तयार करण्यात आलेल्या या चिक्कीला बुरशीमुळे वेगळाच दर्प येत असल्याचे जाणवले. शिवाय, त्यावर मुदत संपण्याची कोणतीही तारीख आढळून न आल्याची गंभीर बाबदेखील पुढे आली आहे.
Comments are closed.