शाकाहारी लोकांसाठी पनीर हा सर्वात पौष्टिक आणि प्रभावी पर्याय
हैदराबाद : एनजीएन न्यूज नेटवर्क
भारतातील शाकाहारी लोकांच्या खाण्यात प्रोटीन्स किंवा प्रथिनांसाठी पनीर नेहमीच महत्त्वाचे ठरले आहे. त्याच बरोबर चौरस आहार किंवा संतुलित पोषणासाठी देखील ते महत्त्वाचे आहे. मांसाहारी लोकांना प्रथिनासाठी विविध प्रकारचे पर्याय मिळतात, मात्र शाकाहारी लोकांसाठी पनीर हा सर्वात पौष्टिक आणि प्रभावी पर्याय आहे. आणि प्रथिनांसाठी तो रोजच्या जेवणातील एक अविभाज्य भाग ठरतो.
असे असले तरीही अनेकांना पनीरच्या त्याच पाककृती पुन्हा पुन्हा खाण्यास कंटाळा येतो. विशेषतः ज्या प्रदेशांमध्ये पनीर पारंपरिकदृष्ट्या खाण्याचा भाग नाही, अशा ठिकाणी तर याचा जास्तच कंटाळा होतो. मात्र, पनीर कोणत्याही पदार्थात सहज सामावून जाते आणि पदार्थाला लज्जतदार बनवते. दक्षिणेकडील चविष्ट ग्रेव्हीपासून ते उत्तरेकडील मलईदार पदार्थांपर्यंत पनीर भारतातील सर्व राज्यांमधील खायच्या पदार्थांचा अविभाज्य घटक ठरू शकतो. तामिळनाडूतील पनीर चेट्टीनाड असो, पंजाबमधील पनीर टिक्का असो किंवा गुजरातमधील पनीरने घातलेला ढोकळा असो, पदार्थाचे पोषणमूल्य वाढवण्यासाठी पनीर कोणत्याही रूपात वापरता येते.
शाकाहारी जेवणातील पनीरच्या महत्त्वाबद्दल गोदरेज जर्सीचे मार्केटिंग प्रमुख श्री. शंतनू राज म्हणाले, “पनीर हा केवळ पॅकेज केलेला अन्नपदार्थ नाही तर तो संतुलित आहारातील एक आवश्यक घटक आहे. प्रथिनांचा नैसर्गिकरित्या एक उत्तम स्रोत असलेल्या पनीरच्या एका पॅकमधून जवळजवळ सहा अंड्यांइतके प्रथिन मिळते. यामुळेच भारतीय जेवणातील पनीर हा एक आवश्यक घटक आहे, जो चव आणि पोषण दोन्हीही देतो. प्रत्येक घराला हे पौष्टिक अन्न मिळावे यासाठी मऊ, ताजे आणि दुधापासून बनवलेले पनीर देण्याचा गोदरेज जर्सीला अभिमान आहे. रोजच्या जेवणातून योग्य पोषण तत्त्वे मिळतील यासाठी जर्सी पनीर खाणे आनंददायी ठरेल याची खात्री करते. बहुमुखी प्रथिन स्रोत म्हणून या सुपरफूडला वाढती मागणी आहे. आमच्या याच दृष्टिकोनामुळे पनीरचा वापर करून तयार केल्या जाणाऱ्या विविध भारतीय पदार्थांबद्दल आम्ही ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करतो. या बरोबरच आम्ही विस्मई फूड्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेफ तेजा परुचुरी यांच्याशी ब्रँड करार केला आहे, जो ग्राहकांना चवदार पनीर रेसिपी एक्सप्लोर करण्यास प्रेरित करतो. हे रेसिपी कूकबुक आमच्या पॅकेजिंगच्या पुढील बाजूस असलेल्या QR-कोडद्वारे तसेच आमच्या डिजिटल चॅनेलद्वारे ग्राहकांना उपलब्ध होऊ शकेल.”
या पदार्थांबद्दल शेफ तेजा म्हणाले, “पनीर हा एक असा बहुमुखी घटक आहे जो असंख्य पाककृतींमध्ये वापरता येतो. ग्रील्ड, स्टिअर-फ्राईड, सॅलडमध्ये टाकून, करीमध्ये मिसळले किंवा पक्वानांत जरी वापरले तरी त्याची चव उत्तम असते. वेगवेगळ्या राज्यांतील वेगवेगळ्या पाककृतींमध्ये पनीरचा वापर केल्याने त्याची चव तर अधिक वाढतेच आणि त्याच वेळी पोषण देखील मिळते.”
गोदरेज जर्सी पनीर हा केवळ एक घटक नाही तर तो ताकद, चव आणि परंपरेचा स्रोत आहे. शेफ तेजा यांच्या दाक्षिणात्य शैलीतील पालक पनीरच्या रेसिपीसाठी येथे क्लिक करा- https://www.youtube.com/watch?v=_zQe9s9wgoQ
Comments are closed.