NGN News
Latest Marathi News

अतिदक्षता विभाग निर्मितीचे आ. सीमा हिरेंचे कार्य कौतुकास्पद

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे गौरवोद्गार

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

रूग्ण सेवा म्हणजेच खरीखुरी ईश्वर सेवा आहे. गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील रूग्णांची सेवा करण्यात मी आधिकाधिक वेळ देत असतो. त्या निमित्ताने मला रूग्ण सेवा करण्याची मोठी संधी मिळते हे माझे भाग्यच आहे.औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना अधिक व्यापक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ईएसआय रुग्णालयात सर्व सोयी -सुविधांनी सुसज्ज असा अतिदक्षता कक्षाची उभारणी केल्याचे आमदार सीमाताई हिरे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जलसंपदामंत्री नामदार गिरीश महाजन यांनी केले आहे.

औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सेवा देण्यासाठी आ. सीमा हिरे यांच्या प्रयत्नातून सातपूर येथील ईएसआय रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अतिदक्षता कक्षाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलतांना नामदार गिरीष महाजन यांनी वरील प्रतिपादन केले.यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष सुनिल केदार,सुनिल बागूल,निमाचे अध्यक्ष आशिष नहार,महेश हिरे,मामा राजवाडे,नगरसेवक सतीश सोनवणे,श्याम बडोदे,राकेश दोंदे,मुकेश शहाणे,प्रतिभा पवार,माधुरी बोलकर,छाया देवांग,वर्षा भालेराव,भाग्यश्री ढोमसे,पुष्पा आव्हाड,कावेरी घुगे,वैद्यकीय अधिक्षक डॉ.बी.एन.पावरा या मान्यंवरांसह विविध कंपन्यांच्या युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

भाषणाच्या प्रारंभीच ना.महाजन यांनी रूग्णालयात आयसीयू कक्षाची उभारणी केल्या प्रकरणी आ. सीमा हिरेंचे अभिनंदन केले.रूग्ण सेवा हिच खरी इश्वरसेवा असे मानत मी गेल्या अनेक वर्षापासून यासाठी झटत असल्याचे सांगत राज्य आणि केंद्राच्या आरोग्या विषयक असलेल्या विविध योजनांची माहिती सांगितली.आरोग्य सेवेसाठी मी सततच तत्पर असल्याचे स्पष्ट्र करत मुंबईत मोफत उपचार हवे असल्यास आ.हिरेंच्या माध्यमातून कधीही माझ्याशी संपर्क साधा असे आवाहनही यावेळी गिरीश महाजन यांनी केले. आमदार हिरे सतत विकासासाठी झटत असतात.त्यांच्या भाषणात त्यांनी मागणी केलेले सर्व विकासकामे मार्गी लावणार असल्याची ग्वाही ना.महाजन यांनी दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडल अध्यक्ष नारायण जाधव, वैभव महाले, राहूल गणोरे, जितेंद्र चोरडिया, अजय बागूल,राजेश दराडे,रामहरि सभेराव,गौरव बोडके, आर.आर.पाटील, प्रकाश चकोर, संदीप देवरे, अनिल भालेराव, निलेश जोशी, बाळा निगळ या पदाधिकाऱ्यांसह रूग्णालयाचे डॉ.बी.एन.पावरा, डॉ.महेश दांडगे, डॉ.नंदकुमार राऊत, डॉ.सरोज जवादे, प्रशांत पंडित, विलास पगार आदींनी विशेष परिश्रम घेतले.

 

Comments are closed.