NGN News
Latest Marathi News

मराठी झी5 कडून 8 ऑगस्टला ‘जारण’ च्या वर्ल्ड डिजिटल प्रीमिअरची घोषणा

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

यंदा ऑगस्ट महिन्यात, झी5-भारतातील अग्रगण्य अति-वैयक्तिकृत (हायपर-पर्सनलाईज्ड), भाषेतील पहिल्या स्ट्रीमिंग मंचावर- ‘जारण’सह वर्ल्ड डिजिटल प्रीमिअरसह मराठी भाषेत भयपट प्रदर्शित करण्यात येईल. आपल्या अभिनयाचा विशेष ठसा उमटवणारी गुणी कलाकार अमृता सुभाष हिची भूमिका असणारा, समीक्षकांच्या कौतुकाला पात्र ठरलेला हा भयपट-थरारपट 8 ऑगस्ट रोजी केवळ झी5 वर प्रदर्शित होणार आहे.

ए अँड एन सिनेमा एलएलपी आणि ए 3 इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस प्रॉडक्शनच्या सहकार्याने अनीस बझ्मी यांनी सादर केलेले आणि दूरदर्शी लेखक हृषिकेश गुप्ते लिखीत- दिग्दर्शित, जारण खोल दफन केलेल्या रहस्यांनी वेढलेल्या कुटुंबाच्या अस्वस्थ करणाऱ्या जगात प्रेक्षकाना खोलवर घेऊन जाते. भूतकाळ गडप नकार देतो तेव्हा उद्भवणारे भयानक परिणाम कथानकाला आणखी सशक्त करतात. भीतीचे अनामिक सावट, एक दीर्घकाळ दडपलेले रहस्य पुन्हा समोर येते- बरे न झालेले आघात सर्वात त्रासदायक मार्गांनी कसे प्रकट होतात ते समोर येते. अभूतपूर्व  रहस्य आणि तीव्र भावनिक नाट्याचे मिश्रण असलेला हा सिनेमा झी5ची धाडसी, विशिष्ट शैलीच्या प्रादेशिक कथाकथनाप्रती असलेली बांधिलकी अधिक घट्ट करतो.

प्रभावी नाट्यमय प्रकाशनानंतर, मनोवैज्ञानिक सखोलता आणि भावनिक असुरक्षितेच्या शोधात उडी मारण्याच्या भीतीपलीकडे, भयपटावरच्या अपारंपरिक दृष्टिकोनासाठी जारणने समीक्षकांची प्रशंसा मिळवली आहे. आता जगभरातील प्रेक्षक ही थरारक कथा घरात आरामात बसून प्रादेशिक भाषेत अनुभवू शकतात.
भय आणि सत्याच्या कचाट्यात अडकलेल्या स्त्रीच्या रूपात अमृता सुभाष  सशक्त अभिनयाचे दर्शन घडवते, तिच्या व्यक्तिरेखेला असलेली भावनिक जोड हा कथेचा आत्मा आहे. अनिता दाते, किशोर कदम, अवनी जोशी, राजन भिसे, सीमा देशमुख यांनीही सहाय्यक भूमिकांमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे.

झी मराठीच्या चीफ चॅनल ऑफिसर आणि झी मराठीच्या बिझनेस हेड हेमा म्हणाल्या“झी5 मध्ये आम्ही अशा कथा सांगण्यावर विश्वास ठेवतो ज्या धाडसी आणि माणसाभवती फिरतात. जारण अगदी तसाच आहे. ही कथा भयपट-थरारपट म्हणून निव्वळ भीतीबद्दल नाही-ती एका आईचे बालपण, तिचे दुःख आणि स्वत:च्या लेकीचे रक्षण करण्यासाठीची तळमळ याबद्दल आहे. दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते कुशलतेने मानसिक तणाव आणि अलौकिक भीती यांचे मिश्रण करतात. बराच काळ ही कथा तुमच्या मनात राहील. अमृता सुभाषने राधा म्हणून एक विलक्षण अभिनय केला आहे- खरा वाटावा, असुरक्षित जाणीव करून देणारा आणि खोलवर खिळवून ठेवणारा. बालपणातील आघाताने त्रस्त असलेली आणि आपल्या मुलीला वाचवण्यासाठी हतबल असलेली आई म्हणून ती या सिनेमाला भावनिक गाभा देते. ही धाडसी मराठी कथा आमच्या प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्हाला विश्वास आहे की तिची व्यक्तिरेखा एक शक्तिशाली, कायमस्वरूपी छाप सोडल्याशिवाय राहणार नाही.”

अभिनेत्री अमृता सुभाषने सांगितले की“जारण’च्या जगात पाऊल टाकणे तीव्र आणि अत्यंत समाधानकारक होते. तुम्हाला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या समान प्रमाणात आव्हान देणारा भय-थरारपट सापडणे दुर्मीळ आहे. हृषिकेशची कथाकथनाची मांडणी अचूक आणि सखोल मानवी आहे-ती केवळ भीतीबद्दल नाही, तर भूतकाळातील प्रतिमा आहेत, ज्या पाहणाऱ्याच्या मनावर उमटल्याशिवाय राहत नाहीत. प्रेक्षक केवळ घाबरतील असं होणार नाही तर त्यांना भीतीमागील असुरक्षितता आणि मानवता देखील जाणवेल याची खात्री मला वाटते. त्यामुळेच जारण खास वाटेल.”

अभिनेत्री अनिता दाते-केळकर म्हणाली“जारण मी यापूर्वी केलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा वेगळा होता. हा सिनेमा केवळ डोळ्याना दिसत असलेल्या भीतीबद्दल नाही- त्यातील भीती तुमच्या मनाचा ताबा घेते. ही भीती मनात हळूहळू खोल शिरते आणि तुमच्याबरोबर राहते. हृषिकेश गुप्ते यांची दूरदृष्टी अचूक असली तरी अर्थ लावण्याचे स्वातंत्र्य कलाकाराला देते. एक अभिनेता म्हणून ही एक देणगी ठरते. प्रत्येक दृश्याला भावनिक प्रामाणिकपणाची गरज होती, अगदी शांततेतही. अशा वचनबद्ध टीमसोबत काम करणे, विशेषतः अमृतासारख्या प्रभावी व्यक्तीसोबत काम करणे हे सर्जनशील आणि अत्यंत प्रेरणादायी होते.”

लेखक आणि दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते पुढे म्हणाले“जारणमध्ये मला केवळ अज्ञात भीती म्हणून नव्हे तर आपल्या आतील जखमा, रहस्ये आणि दडपलेल्या भावनांचे प्रतिबिंब म्हणून भीतीची कल्पना नव्याने करायची होती. ही कथा आपल्या मनात असणाऱ्या भावनिक, मानसिक पातळीवर आणि पूर्वापार खोल दडलेल्या भूतावळीबद्दल आहे. अमृता सुभाषसारख्या कलाकारासोबत काम केल्याने कथेत प्रचंड सखोलता आली. प्रादेशिक कथाकथनात आपली ओळख निर्माण करणाऱ्या  झी 5 या मंचाच्या माध्यमातून हा सिनेमा मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी रोमांचित आहे. जारण ही केवळ एक कलाकृती नसून हा एक असा अनुभव आहे जो श्रेय मिळाल्यानंतर बराच काळ टिकतो आणि मला आशा आहे की अधिकाधिक लोकांना तो अनुभवता येईल.”


8 ऑगस्ट 2025 पासून झी5 वर समीक्षकांनी कौतुक केलेला मराठी भयपट “जारण” पहा.

Comments are closed.