NGN News
Latest Marathi News

कल्याणकारी महामंडळ कागदावर नको, वास्तवात हवे !

  • वृत्तपत्र विक्रेत्यांचा महसूल आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा
  • मंत्रिमंडळ निर्णयाला दोन वर्षे पूर्ण; तरीही अंमलबजावणी नाही; आरोग्य विमा, अपघात विमा, निवृत्तिवेतन आणि ङआर्थिक तरतुदींची विक्रेत्यांची जोरदार मागणी

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिकरोड : राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेऊनही त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. शासनाने दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी आणि महामंडळ तातडीने कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (९ ऑक्टोबर) नाशिकमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांनी महसूल आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून महसूल आयुक्तांमार्फत निवेदन सादर करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या नेतृत्वाखाली नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्था, नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना, नवीन नाशिक (सिडको) वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्था आणि सातपूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी व विक्रेते या आंदोलनात सहभागी झाले.
राज्य शासनाने १० ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाची अद्याप प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे राज्यातील हजारो वृत्तपत्र विक्रेते सामाजिक सुरक्षा आणि विविध कल्याणकारी योजनांच्या लाभांपासून वंचित असल्याची खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, ११ मार्च २०२६ रोजी झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानही महामंडळ स्थापन करण्याबाबत आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आश्वासनानंतरही प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्याने विक्रेत्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

चार प्रमुख मागण्यांसाठी शासनाला साकडे

वृत्तपत्र विक्रेत्यांनी निवेदनातून चार प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार महामंडळाची तातडीने स्थापना करून ते प्रत्यक्ष कार्यान्वित करावे, महामंडळाच्या योजना चालविण्यासाठी शासनाने अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करावी, वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आरोग्य विमा, अपघात विमा आणि निवृत्तिवेतन योजना तातडीने सुरू कराव्यात, तसेच राज्यातील सर्व अधिकृत वृत्तपत्र विक्रेत्यांच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ करून ती तातडीने पूर्ण करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

पहाटेपासून वृत्तपत्र वितरणाचे काम करणारे विक्रेते समाजापर्यंत माहिती पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम करतात. मात्र, त्यांच्या भविष्याची सुरक्षितता, आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य याबाबत ठोस व्यवस्था नसल्याची भावना विक्रेत्यांनी व्यक्त केली. शासनाने स्वतः घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने केली नाही, तर हा निर्णय केवळ कागदावरच राहण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
“महामंडळ स्थापनेचा निर्णय झाला; मग अंमलबजावणीला विलंब का?” असा सवाल उपस्थित करत शासनाने आता केवळ आश्वासने न देता ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. महामंडळ कार्यान्वित झाल्यास वृत्तपत्र विक्रेत्यांना सामाजिक सुरक्षेच्या योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा संघटनांनी व्यक्त केली.

विक्रेत्यांचा मोठा सहभाग

मोर्चात महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे विभागीय संघटन सचिव महेश कुलथे, नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर, दत्ता ठाकरे, नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार आणि सातपूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष राजू अनमोला यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले.

तसेच बाळू सूर्यवंशी, संजय शेलार, किरण गवळी, नितीन वाईकर, विजय मोरे, सतीश मथुरे, संदीप महाजन, अमोल शहाणे, संजय चव्हाण, दत्ता गांगुर्डे, बाळकृष्ण चौधरी यांच्यासह नाशिकरोड, नाशिक शहर आणि सातपूर परिसरातील मोठ्या संख्येने वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.

आता शासन या मोर्चाची आणि निवेदनातील मागण्यांची दखल घेऊन वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी मंजूर केलेले कल्याणकारी महामंडळ प्रत्यक्षात सुरू करणार का, याकडे राज्यातील विक्रेत्यांचे लक्ष लागले आहे.यावेळी नाशिक रोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे सदस्य श्री विजय सोनार सुनील मगर किशोर सोनवणे इस्माईल पठार संजय तांजनपुरे महेश कुलथे अनिल कुलथे उल्हास कुलथे वसंत घोडे संदीप डहाळे अशोक पुढे सुखदेव जाधव विशाल पागिरे संदीप कळमकर दत्ता मीराने राजेंद्र शिंदे किशोर शिंदे चंद्रकांत रहाडे विकास रहाडे विजय गवारे दगू पवार विनायक मांडे ज्ञानेश्वर गवळी संदीप परसे हर्षल लोखंडे हर्षल ठोसर सुखदेव जाधव बाळासाहेब ढोमसे प्रताप गांगुर्डे कैलास मस्के उत्तम गांगोडे इब्राहिम खान महेश हसे संतोष गवळी बाळकृष्ण चंद्र मोरे सतीश आहेर सचिन आडके संपत निर्भवणे रवी सोनवणे भारत सोनवणे सुभाष आड बाई राजेंद्र थोरमिसे भारत माळवे मधुकर सोनार बंटी भालेराव दीपक डहाळे आनंद माळवे सिद्धार्थ पगारे विजय सोनार अन्वर पठाण संदीप मढवई सुनील शिंदे इसाक खान विजय विसपुते वाघ काका ऋषी आडभाई बाबासाहेब ओहोळ अनिल पोफळे सुनील सूर्यवंशी गौतम सोनवणे शिरीष कर्णिक अमोल शहाणे संजय चव्हाण दत्ता मीराणे अनिल दिवे मोहन कराडकर हेमंत पोटे बाळासाहेब वाडेकर जुबेर पठाण राजेश साळुंखे योगेश भट श्रीकांत पर घर मोर पप्पू शहाणे विजय रोकडे कमलाकर डमाळे शशिकांत बोरसे रवी भोसले नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सदस्य नामदेव सोनार, ज्ञानेश्वर धाञक महेश मणियार उमेश करकरे बाळासाहेब धोतरे मोंटू लांडगे व्यंकू गायकवाड युसूफ शेख बाळू रामचंद्र नारायणे
संदीप शरद मिश्रा कैलास गंगाधर गिरणारे हिराकांत कोरगावकर पूनम लोढे रविंद्र सजगुरे विश्वनाथ सजगुरे प्रकाश सजगुरे प्रकाश क्षिरसागर ज्योती दगातप बाळू रवळ मंगेश डाहाळे अशोक वाकळमाळी सदाशिव बेंडके सुधीर डी. शिंदे विजय बी. थोरात रविंद्र बाबुराव खैरनार आशा कांतिलाल जाधव पंकज डगाभाऊ भदाणे दिलावर टकले देवानंद जोशी राजेंद्र वागळे ज्ञानेश्वर घागड पांडुरंग जाधव विनोद कपोते चंद्रकांत पवार अमोल जगताप शरद टिळे कैलास पवार रमेश पवार दिपक कचरे प्रकाश कुलकर्णी शरदकांत जाधव पंकज जाधव नितीन जाधव महेश गांगुर्डे कालू शेठ आनंद लेले मोहन जाधव कैलास बराटे मोहसिन सय्यद खंडू मगर ज्ञानेश्वर ठाकरे दिपू गोसावी रमेश शिरसाट सुनिल बाहीरकर त्रिंबक रमण कोठी सुरेश सोनवणे दत्तात्रय काळे रमेश सावंत नितीन बन पुरुषोत्तम कोरे विद्या पुजार नितीन मधुकर मोर पप्पू जाधव महेंद्र मोरे सुरेशचंद पवार संतोष डहाळे महेश हिंगे सुरेश्वर काळे किरण पाडोळे संदीप कचरे चंद्रकांत राऊत विमल गुजर दत्ता पवार विलास मोरे शनेश्वर गवळी संतोष मोरे दशरथ स्वामी महेश घाटे दत्ता गांगुर्डे बाळकृष्ण चौधरी
सातपूर वृत्तपत्र विक्रेता संघटना : राजू संगाराम अनमोला सचिन शंकर वरंदक सुरेशान विठोबा शिंदे (मामा) शरद तुकाराम पावसे
संदीप मोळा जाधव संतोष चंबक खैर सागर तुकाराम अत्रे संजय विश्वास पाटील राजकुमार लक्ष्मण कायरथा सुरेश गंगाधर भांड संदीप मोतीराम चौधरी संदीप चंबक खैर दिपक मोहन जाधव संदीप तुकाराम अत्रे कोरे पुरुषोत्तम संजय
वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्था नवीन नाशिक सिडकोचे दत्ता ठाकरे बाळू सुर्यवंशी संजय शेलार किरण गवळी नितीन वाईकर विजय मोरे सतीश मथुरे बाळू कुहिरे संदीप महाजन शुभम जाधव आकाश कारे गजू गोराडे देवक आल्हाट अर्जुन शिंदे मिथुन बैरागी रविंद्र वाघ मयूर गांगुर्डे
सागर पडळ प्रतीक कर्पे तुकाराम पाटील काशिनाथ चौधरीबाळकृष्ण नेरे श्रीनाथ आव्हाड आकाश कोळप संतोष जाधव विनोद चव्हाण संदिप शिरसागर श्रीकांत शिंदे महेश गांगुर्डे सचिन शिंदे गोविंद हिंगे दादा हिंगे प्रकाश राऊत ईश्वर शिरसाट निलेश ठाकरे दीपक थावरे सचीन बागुल
यांच्या सह नाशिक मधील सर्व दैनिकांचे प्रतिनिधी कर्मचारी ऑफिस बॉय एजंट यांच्यासह नाशिक शहरातील वृत्तपत्र वितरण देवदत्त जोशी तसेच राजेंद्र ट्रान्सपोर्ट चे संचालक नाना कानडे उपस्थित होते

Comments are closed.