NGN News
Latest Marathi News

सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान


* ​* एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : ‘सेंट फ्रान्सिस हायस्कूल’च्या इयत्ता ४ मधील अश्लेषा अजित सुरासे आणि रुद्र पाठक या दोन विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. ही शाळेसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

विद्यार्थ्यांचे कष्ट आणि बुद्धिमत्तेची दखल घेण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात आली. दोन्ही विद्यार्थ्यांनी अभ्यासातील सातत्य व निष्ठेच्या बळावर शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

शाळेच्या मुख्याध्यापिका मिस मंजू पाटील, प्राथमिक विभाग प्रमुख श्रीमती उषा शेट्टी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही अधिक मेहनत घेण्याची प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन केले. तसेच शाळा व्यवस्थापनानेही विद्यार्थ्यांचे कौतुक केले

Comments are closed.