
भोंदूगिरी व बेकायदेशीर औषध निर्मिती; अंनिसच्या पाठपुरव्याला यश
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : सिन्नर तालुक्यातील जायगांव येथील डॉ मोहन पुरी यांच्या शिवनाथ आयुर्वेद प्रॉडक्ट कंपनी नावाच्या औषध निर्मितीचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफ. डी.ए.) कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे . सदरच्या भोंदूगिरी व बेकायदेशीर औषध निर्मिती विरोधात अंनिसने पाठपुरावा केला होता.
याबाबत अंनिस ने निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार भोंदू खरात प्रकरणानंतर महाराष्ट्र अंनिसने अनेक भोंदू विरोधात गुन्हे दाखल केले आहे. संगमनेर जवळील वडगाव पान येथील बहुचर्चित भोंदू राजेंद्र गडगेबाबा विरोधात अंनिसच्या राज्य सचिव एडवोकेट रंजना पगार-गवांदे यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यात सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील डॉ मोहन पुरी हा सहआरोपी आहे. कारण सदर भोंदूच्या दरबारात हा डॉक्टर बोगस औषधे देत होता. पोलिसांना तसा साठा सापडला होता.एडवोकेट पगार -गवांदे यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे डॉ पुरी हा नियमबाह्य व संशयास्पद पद्धतीने औषध निर्मिती करत असल्याची तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारे नाशिक येथील अन्न व औषध प्रशासनाने जायगांव येथे छापा टाकून प्रत्यक्ष तपासणी केली.
या तपासणीत औषध निर्मितीचे निकष पाळले जात नसल्याचे , उत्पादन प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचे व औषध व प्रशासन कायद्यातील अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. या निष्कर्षाच्या आधारे अन्न व औषध प्रशासने डॉ पुरी यांना नोटिस बजावून स्पष्टीकरण मागवले.त्यानंतर या विषयावर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने ३० जून २०२६ रोजी अंतरिम आदेश पारित केला.त्यानुसार सदर औषध निर्मितीचा परवाना कायमचा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.नाशिक परिमंडळ -२ चे सहाय्यक आयुक्त ( औषधे) व अनुज्ञप्ति अधिकारी चं. अ.मोरे यांनी याविषयी ची अधिकृत माहिती एडवोकेट रंजना पगार -गवांदे यांना पत्राद्वारे कळविली आहे. तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार डॉ मोहन पुरी हा भोंदू राजेंद्र गडगे बाबाचा निकटवर्तीय व कथित हस्तक असल्याचे समोर आले आहे. विविध भोंदूबाबांना औषध पुरवठा करत असल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात आला आहे.प्रसिद्धी पत्रकावर अंनिसचे एडवोकेट रंजना पगार-गावंदे , डॉ.टी. आर. गोराणे , प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, कृष्णा चांदगुडे आधीच्या स्वाक्षऱ्या आहेत.सिन्नरच्या
Comments are closed.