NGN News
Latest Marathi News

आधुनिक महिलांसाठी पीएनजी ज्वेलर्सचा ‘यू’ हलक्या वजनाच्या दागिन्यांचा नवा ब्रँड

‘लाइटस्टाईल ‘ चे “यू” मध्ये रूपांतर; दैनंदिन वापरासाठी आधुनिक डिझाइन्सवर भर

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक: १८३२ पासून विश्वास आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा जपणाऱ्या पीएनजी ज्वेलर्सने आपल्या हलक्या वजनाच्या डायमंड ज्वेलरी ब्रँड ‘लाइटस्टाईल’चे ‘यू’ या नव्या नावाने पुनर्ब्रँडिंग केली आहे.  आधुनिक महिलांची बदलती जीवनशैली, त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि स्वतःची वेगळी ओळख व्यक्त करण्याची इच्छा लक्षात घेऊन दैनंदिन वापरासाठी आकर्षक, आधुनिक आणि कमी वजनाच्या दागिन्यांची नवी ओळख म्हणून ‘यू’ सादर करण्यात आला आहे.

पारंपरिक दागिन्यांबरोबरच स्टायलिश, सहज परिधान करता येणाऱ्या डिझाइन्सच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत सुरू करण्यात आलेला हा ब्रँड महिलांना दागिने केवळ विशेष प्रसंगांसाठी नव्हे, तर रोजच्या वापरातही आत्मविश्वासाने परिधान करण्यासाठी प्रेरित करतो. पीएनजी ज्वेलर्सच्या विश्वासार्हतेचा वारसा कायम ठेवत, आधुनिक डिझाइन, वैयक्तिक अभिव्यक्ती आणि उत्कृष्ट कारागिरीचा समतोल साधण्याचा प्रयत्न ‘यू’ द्वारे करण्यात आला आहे.

‘यू’ मध्ये ९, १४, १८ आणि २२ कॅरेट सोन्यातील तसेच डायमंड ज्वेलरीची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. अंगठ्या, कानातले, चेन, पेंडंट, ब्रेसलेट, बांगड्या, मंगळसूत्रे तसेच पुरुषांसाठीचे दागिने अशा विविध प्रकारांचा यात समावेश असून, दैनंदिन वापरापासून ते विशेष प्रसंगी सहज परिधान करता येतील अशा आधुनिक डिझाइन्स ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.  सध्या महाराष्ट्र आणि गोव्यातील १३ ठिकाणी ईबीओ (ब्रँडचे एकमेव विक्री केंद्र) स्वरूपात तसेच पाच राज्यांमध्ये शॉप इन शॉप (एसआयएस ) स्वरूपात यू ची उपस्थिती आहे. कमी वजनाच्या डायमंड ज्वेलरीसाठी भारतातील ग्राहकांचे पसंतीचे डेस्टिनेशन बनण्याचे यू चे उद्दिष्ट असून, २०३० पर्यंत एसआयएस  आणि ईबीओ स्वरूपात १०० नवीन स्टोअर्स सुरू करण्याचे लक्ष्य ब्रँडने निश्चित केले आहे.

‘यू’ बाय पीनजी ज्वेलर्स ची ब्रँड अॅम्बेसेडर सारा तेंडुलकर म्हणाल्या, “आजच्या पिढीसाठी दागिने म्हणजे केवळ अलंकार नसून स्वतःची ओळख व्यक्त करण्याचे माध्यम आहे. ‘यू’ महिलांना प्रत्येक दिवस स्वतःचा साजरा करण्याची प्रोत्साहन देतो. आधुनिक, सहज वापरता येणारे आणि वैयक्तिक अभिव्यक्ती दर्शविणारे डिझाइन्स ही या ब्रॅंड ची खासियत आहे. दागिने घालण्यासाठी खास प्रसंगाची वाट पाहण्याची गरज नाही. प्रत्येक दिवस स्वतःचा आनंद साजरा करण्याची संधी असते.”

पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, “पीएनजी ज्वेलर्सने नेहमीच बदलत्या ग्राहकांच्या अपेक्षांनुसार स्वतःला विकसित केले आहे. ‘यू’ हा त्याच प्रवासातील पुढचा टप्पा आहे. आधुनिक महिलांच्या जीवनशैलीला अनुरूप, विश्वास, शुद्धता आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा जपत अधिक नाविन्यपूर्ण आणि समकालीन दागिने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

Comments are closed.