एनएफओ 6 ऑक्टोबर रोजी सुरू; 20 ऑक्टोबर 2025 रोजी बंद होणार
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (केएमएएमसी) ने कोटक गोल्ड सिल्व्हर पॅसिव्ह एफओएफ च्या शुभारंभाची सहर्ष घोषणा केली आहे. ही कोटक गोल्ड ईटीएफ आणि कोटक सिल्व्हर ईटीएफ च्या युनिट्समध्ये गुंतवणूक करणारी एक ओपन-एंडेड फंड ऑफ फंड स्कीम आहे. कोटक गोल्ड ईटीएफ आणि कोटक सिल्व्हर ईटीएफ च्या युनिट्समध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवलवृद्धी देण्याचा या नावीन्यपूर्ण फंडचा हेतू आहे, शिवाय गुंतवणूकदारांना सोने आणि चांदी या दोन मौल्यवान धातूंपर्यंत पोहोच देखील मिळेल. ही स्कीम सार्वजनिक सब्स्क्रिप्शनसाठी 6 ऑक्टोबर 2025 रोजी उघडला असून 20 ऑक्टोबर 2025 रोजी बंद होईल.
सोने आणि चांदी यांसारख्या मौल्यवान धातूंनी खूप पूर्वीपासून मूल्य-भंडाराचे काम केले आहे आणि, महागाई आणि करन्सी अवमूल्यनाविरुद्ध बचावात्मक कामगिरी केली आहे. जागतिक स्तरावर केंद्रीय बँका आपला सुवर्ण संग्रह वाढवत आहेत आणि औद्योगिक व गुंतवणूक सेगमेन्टमध्ये चांदीची मागणी वाढत आहे, अशावेळी, कोटक गोल्ड सिल्व्हर पॅसिव्ह एफओएफ या अॅसेट वर्गात एक समयोचित आणि वैविध्यपूर्ण एंट्री प्रदान करतो.
कोटक गोल्ड सिल्व्हर पॅसिव्ह एफओएफ कोटक गोल्ड ईटीएफ आणि कोटक सिल्व्हर ईटीएफ मध्ये गुंतवणूक करेल आणि या दोन्ही धातूंपर्यंत किफायतशीर पद्धतीने पोहोच देईल. एक आंतरिक क्वांटिटेटिव्ह मॉडेल सोने आणि चांदीत त्यांच्या मूल्यांच्या हालचालीच्या आधारे वाटप करते व अशाप्रकारे मानवी पूर्वग्रह आड येत नाहीत. या मॉडेलमध्ये बदल टिपण्यासाठी गतिशील पुनर्संतुलन आहे, ज्यामुळे मौल्यवान धातूंच्या बाजारात एक शिस्तबद्ध आणि डेटा-समर्थित भागीदारी सुनिश्चित होते.
कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे मॅनिजिंग डायरेक्टर निलेश शाह म्हणाले, “अॅसेट अॅलोकेशन प्रत्येक पिचसाठी सुयोग्य खेळाडू निवडण्यासारखे असते. बाजारात जेव्हा तेजी असते तेव्हा सोने आणि चांदी नेहमी पोर्टफोलियोमध्ये एखाद्या ऑलराऊंडरची भूमिका बजावत असतात. केंद्रीय बँका आपला सुवर्ण संग्रह वाढवत आहेत आणि औद्योगिक संदर्भात चांदीची मागणी वाढत आहे, तर दुसरीकडे इक्विटी मार्केट अस्थिर आहे, अशावेळी, गुंतवणूकदारांनी या धातूंमधून जास्तत जास्त लाभ मिळवला पाहिजे. मौल्यवान धातू पोर्टफोलियोमध्ये जोडण्याचा अर्थ सुसाट धावणे नाही, तर सर्व मोसमांसाठी एक लवचिक टीम उभी करणे असा आहे. कोटक गोल्ड सिल्व्हर पॅसिव्ह एफओएफ केवळ एकाच परिणामावर डाव न लावता विविधता आणण्याचा एक शिस्तबद्ध मार्ग प्रदान करते. कारण, गुंतवणुकीत अती आत्मविश्वासाने नाही तर योग्य मिश्रण आणि सातत्य यांच्या मदतीने सामना जिंकता येतो.”
हा फंड अशा गुंतवणूकदारांसाठी डिझाईन करण्यात आला आहे, ज्यांना सोने आणि चांदीत गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवल वृद्धी करण्याची इच्छा आहे. ज्यांना, खास करून व्यापक आर्थिक अनिश्चिततेच्या काळात आपल्या पोर्टफोलियोत पारंपरिक इक्विटी आणि डेट इन्स्ट्रूमेंट्सच्या पलीकडे जाऊन विविधता आणायची इच्छा आहे त्यांच्यासाठी तो अनुकूल आहे. स्वतंत्र ईटीएफs मध्ये गुंतवणूक केल्यास सोने आणि चांदीत पुनर्संतुलन करताना कॅपिटल गेन टॅक्स लागू शकतो, त्याऐवजी हा फंड आंतरिकरित्या वाटप करतो आणि सोने आणि चांदी यांच्यात अदलाबदली करताना कॅपिटल गेन टॅक्स आकर्षित न करता दोन्ही धातूंपर्यंत पोहोचण्याचा मार्ग ऑफर करतो.
कोटक गोल्ड सिल्व्हर पॅसिव्ह एफओएफचे फंड मॅनेजर श्री. रोहित टंडन म्हणाले, “गुंतवणूकदारांना मौल्यवान धातूंमध्ये वाटप करण्याचे सोपे सोल्यूशन प्रदान करण्यासाठी गोल्ड सिल्व्हर पॅसिव्ह एफओएफ ची रचना करण्यात आली आहे. एकाच फंडमध्ये सोने आणि चांदीच्या क्षमता एकत्रित करून हा फंड गुंतवणूकदारांना या दोन्ही अॅसेट्सच्या स्वरूपांचा लाभ मिळवण्यास सक्षम बनवतो. हा फंड एक नियम-आधारित क्वांटिटेटिव्ह मॉडेलचा उपयोग करतो, जे कोटक गोल्ड ईटीएफ आणि कोटक सिल्व्हर ईटीएफ मधील वाटपास गतिशील पद्धतीने पुनर्संतुलित करते. हा दृष्टिकोन बाजारातील बदल समजण्यास मदत करतो, ज्यामुळे गुंतवणूकदारांना कालांतराने दोन्ही धातूंमध्ये एक सक्रिय पोहोच मिळते.”
Comments are closed.