NGN News
Latest Marathi News

कपिलधारा तीर्थावर श्रावणात लाखभर भाविकांकडून दर्शनाचा लाभ

इगतपुरी : वाल्मिक गवांदे
इगतपुरी तालुक्यातील कुंभमेळा सिंहस्थाचे मूलस्थान असलेल्या श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थावर चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. चौथ्या श्रावणी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला होता. महिन्याभरात आतापर्यंत जवळपास एक लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे. तसेच आलेल्या भाविकांसाठी आतापर्यंत आठ क्विंटल खिचडी वाटप करण्यात आली.

दरम्यान कपिलधारा तीर्थावर संत ज्ञानेश्वरांनी मृत ब्राह्मणाच्या मुलाला पाणी पाजून जिवंत केले. समर्थ रामदासांनी येथेच शिवाजी महाराजांना उपदेश दिला. तसेच येथे गजानन महाराजांनी बारा वर्षे तपस्या केली व नंतर ते शेगावला गेले. तपस्य भूमी असलेल्या या कपिलधारा तीर्थावर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात कपिलधारा तीर्थ क्षेत्रापासून होते. तसेच येथे कामाक्षी माता चे मंदिर असून या ठिकाणी भाविक येत असतात या तीर्थाला प्रभू रामायणाचा वारसा लाभलेला आहे. कावनई हे तीर्थस्थान ११ लाख ३२ हजार वर्ष प्राचीन आहे. या तीर्थावर सर्व प्रथम कुंभमेळा भरत होता. येथे स्नान केल्यावर गंगासागर तीर्थाचे पुण्या प्राप्त होते अशी माहिती येथील विश्वस्त कुलदीप चौधरी यांनी दिली आहे. या तीर्थावर सत्युगामध्ये भगवान कपिल आपल्या आईला सांख्य शास्त्राचे उपदेश देवून स्वर्गाला पाठविले. त्यामुळे हे तीर्थ मातृ गया झाले. या तीर्थावर श्रीराम व भगवान शंकर यांची भेट झाली. या तीर्थाला साक्षात हनुमानाचे चरण लागलेले आहेत. यावेळी मंदिराचे महंत रामनारायणदास फलहरी महाराज, विश्वस्त कुलदीप चौधरी, पुरनचंद्रदास महाराज, प्रभूदास, भरतदास यांच्यावतीने भाविकांचे स्वागत केले.

Comments are closed.