NGN News
Latest Marathi News

नवनीत एज्युकेशनतर्फे 1 लाख शिक्षकांना नवनीत एआय मोफत लायसन्स

  • नवनीतच्या देशव्यापी उपक्रमातून शिक्षकांना मोफत एआय टूल्स, इंटरऍक्टिव्ह कंटेंट उपलब्ध होणार; आयआयटी गांधीनगरसोबतच्या विशेष मास्टरक्लाससाठी पात्र ठरण्याची संधीही मिळणार 

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

 नवनीत एज्युकेशन लिमिटेडने (एनईएल ) देशभरातील 1 लाख शालेय शिक्षकांसाठी एक महत्त्वाचा उपक्रम जाहीर केला आहे. या उपक्रमाअंतर्गत 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षकांना कंपनीच्या प्रमुख एआय प्लॅटफॉर्म नवनीत एआय चा मोफत वापर करता येणार आहे. राज्य मंडळे, सीबीएसई आणि राष्ट्रीय स्तरावरील इतर शिक्षण मंडळांच्या शिक्षकांसाठी नवनीत एआय ची रचना करण्यात आली आहे. पारंपरिक अध्यापनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन दैनंदिन अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरणार आहे. एआयवर आधारित अध्यापन साधनांमुळे शिक्षकांना धड्यांचे अधिक चांगले नियोजन करता येणार आहे. तसेच प्रशासकीय कामांचा भार कमी होणार असून विद्यार्थ्यांसाठी वर्गातील शिकण्याचा अनुभव अधिक रंजक आणि परिणामकारक करता येणार आहे.

या उपक्रमाअंतर्गत शिक्षकांना नवनीत एआय चा संपूर्ण ऍक्सेस मिळणार आहे. यामध्ये मॅजिक टूल्सच्या मदतीने काही क्षणांत पीपीटी, उजळणीसाठी फ्लॅशकार्ड्स आणि विषयनिहाय धड्यांचे नियोजन तयार करता येणार आहे. यातून एनईपी 2020 आणि एनसीएफ 2023शी सुसंगत अध्यापनासाठी आवश्यक कंटेंट तयार करता येणार आहे. नवनीतची डिजिटल ई-बुक्स आणि व्हिडिओ इंटरऍक्टिव्ह कंटेंटमध्ये रूपांतरित करण्यासाठी मॅजिक बोर्डची सुविधा देण्यात आली आहे. यात अनेक भाषांचा पर्यायही उपलब्ध आहे. शरीरशास्त्र आणि खगोलशास्त्राशी संबंधित 27हून अधिक थ्रीडी मॉडेल्स तसेच गणित आणि विज्ञानासाठी 57हून अधिक पीएचईटी सिम्युलेशन्सही यामध्ये आधीपासून उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना अधिक रंजक पद्धतीने शिकता यावे यासाठी भूगोल, इंग्रजी, संगीत, संगणक आणि मानसिक स्वास्थ्य अशा विविध विषयांसाठी मॅजिक ऍप्स उपलब्ध आहेत. मॅजिक गेम्समध्ये आधीपासून तयार केलेले गेम्स तसेच गरजेनुसार बदल करता येतील असे टेम्प्लेट्सही देण्यात आले आहेत. नवनीत एआय मध्ये ‘झिरो प्रॉम्प्ट एक्सपिरियन्स’ देण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांना प्रॉम्प्ट इंजिनीअरिंगसारखे अवघड कौशल्य शिकण्याची गरज भासणार नाही. नवनीतच्या 65 वर्षांच्या दर्जेदार शैक्षणिक कंटेंटच्या आधारावर विश्वासार्ह माहिती देण्याची क्षमता या प्लॅटफॉर्ममध्ये आहे. शिक्षणासाठी खास तयार करण्यात आलेले भारतातील पहिले कस्टम एज्युकेशन मॉडेल म्हणूनही नवनीत एआय वैशिष्ट्यपूर्ण ठरते. हे शिक्षण क्षेत्रासाठी खास विकसित केलेले 3B पॅरामीटरचे डोमेन-स्पेसिफिक एआय मॉडेल आहे. याशिवाय मॅजिक बॉट हा वैयक्तिक एआय टीचिंग असिस्टंटही शिक्षकांना उपलब्ध होणार आहे. त्याला अवघड सूचना किंवा सविस्तर संदर्भ देण्याची गरज नसून शिक्षकांची मागणी समजून त्यानुसार तो मदत करतो.

शिक्षकांना नवनीत एआय चा प्रभावीपणे वापर करता यावा यासाठी नवनीतकडून सातत्याने सहाय्यही केले जाणार आहे. त्यासाठी वेळोवेळी व्हर्च्युअल ट्रेनिंग वेबिनार आयोजित करण्यात येतील. या वेबिनारच्या माध्यमातून वर्गात एआयच्या विविध सुविधांचा अधिक प्रभावी वापर कसा करायचा, याचे प्रशिक्षण शिक्षकांना दिले जाईल. शिक्षकांसाठी स्वतंत्र व्हॉट्सऍप कम्युनिटीही तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून त्यांना एकमेकांकडून शिकता येईल आणि अध्यापनाच्या प्रभावी पद्धतींची देवाणघेवाण करता येईल. नियमितपणे वेबिनारमध्ये सहभागी होणाऱ्या आणि नवनीत एआय चा सक्रिय वापर करणाऱ्या शिक्षकांना आयआयटी गांधीनगरच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष एआय मास्टरक्लाससाठी पात्र ठरण्याची संधीही मिळणार आहे.

नवनीत टॉपटेकचे सीईओ हर्षिल गाला म्हणाले, “शिक्षक हा आपल्या शिक्षण व्यवस्थेचा कणा आहेत. मात्र प्रशासकीय कामे आणि धड्यांच्या तयारीत त्यांचा बराच वेळ जातो. नवनीत एआय च्या माध्यमातून आम्ही अत्याधुनिक एआयवर आधारित अध्यापन साधने थेट शिक्षकांच्या हाती देत आहोत. शिक्षकांची जागा घेणे हा यामागचा उद्देश नाही, तर त्यांच्या कामात सक्षम सहायक म्हणून भूमिका बजावणे हा आहे. अधिक स्मार्ट पद्धतीने धडे तयार करण्यास मदत झाल्यामुळे शिक्षकांचा वेळ वाचेल. त्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे आणि वर्गातील शिकण्याचा अनुभव अधिक प्रभावी करणे यावर लक्ष केंद्रित करता येईल. शैक्षणिक वर्ष 2026-27साठी 1 लाख मोफत लायसन्स देण्यामागे एआयच्या या बदलात एकही शिक्षक मागे राहू नये, ही आमची बांधिलकी आहे. “

नवनीत एआय आता 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी उपलब्ध झाले आहे. लायसन्सचे वितरण आणि शाळांची नोंदणी नवनीत एज्युकेशनच्या संस्थात्मक नेटवर्कच्या माध्यमातून थेट केली जात आहे. प्लॅटफॉर्मविषयी अधिक माहिती, वेबिनारचे वेळापत्रक किंवा डेमो पाहण्याची सुविधा हवी असलेले शिक्षक आणि शाळांचे प्रमुख या पोर्टलला भेट देऊ शकतात : https://bit.ly/4fGwX1y

Comments are closed.