NGN News
Latest Marathi News

नाशिक मान्सून हेल्थ वॉच: स्टार हेल्थकडून ताप, डेंग्यू आणि मलेरियाच्या धोक्याचा इशारा

विमाधारक होम हेल्थकेअर आणि नियोजित रुग्णालयात दाखल होण्याच्या मदतीसाठी टॉक टू स्टारला ७२०० २२२ ३३३ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात, तर बिगर-विमाधारक स्टार हेल्थ कस्टमर अॅपच्या माध्यमातून मोफत २४/७ व्हर्च्युअल ओपीडी सेवेचा लाभ घेऊ शकतात

नाशिकसाठी महत्त्वाचे मुद्दे

·         महाराष्ट्रात आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ताप आणि संसर्गजन्य आजारांसाठी स्टार हेल्थच्या होम हेल्थकेअरचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत पाच पटीने वाढ झाली आहे.

·         ग्राहक वैद्यकीय सल्ल्यासाठी पहिली पायरी म्हणून ऑनलाईन डॉक्टरांच्या सल्ल्याला मोठ्या प्रमाणावर पसंती देत असल्याने व्हर्च्युअल ओपीडीचा वापर वेगाने वाढत आहे.

·         विमाधारक टॉक टू स्टारला ७२०० २२२ ३३३ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात; होम हेल्थकेअरसाठी १ दाबा आणि नियोजित रुग्णालयात दाखल होण्याच्या मदतीसाठी २ दाबा.

·         बिगर-विमाधारक स्टार हेल्थ कस्टमर अॅपच्या माध्यमातून मोफत २४/७ व्हर्च्युअल ओपीडी सेवेचा लाभ घेऊ शकतात.

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिकमध्ये पावसाळा सुरू झाला असून या काळात डेंग्यू, मलेरिया, ताप आणि इतर संसर्गजन्य आजार सामान्यतः वाढतात. याच पार्श्वभूमीवर स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एनएसई: स्टारहेल्थ; बीएसई: ५४३४१२) या भारतातील आघाडीच्या स्वतंत्र आरोग्य विमा कंपनीने राज्यभरात आपली पावसाळी आरोग्य सेवा मोहीम अधिक तीव्र केली आहे. स्टार हेल्थच्या आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या महाराष्ट्रातील आकडेवारीनुसार, ताप आणि संसर्गजन्य आजारांसाठी होम हेल्थकेअर सेवेचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत पाच पटीने वाढ झाली आहे. या वाढीसोबत, कंपनीने देशभरात नुकत्याच सुरू केलेल्या व्हर्च्युअल ओपीडी सेवेलाही अभूतपूर्व मागणी मिळाली आहे, ग्राहक वैद्यकीय सल्ल्यासाठी पहिली पायरी म्हणून या सेवेला मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत.

या मोहिमेचा मुख्य उद्देश विमाधारकांना टॉक टू स्टार आणि होम हेल्थकेअर मदतीशी जोडून आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात मदत मिळवून देणे हा आहे. त्याच वेळी सर्वसामान्य जनतेला स्टार हेल्थ कस्टमर अॅपच्या माध्यमातून मोफत २४/७ व्हर्च्युअल ओपीडी सेवेचा लाभ घेता येणार आहे. विमाधारकांसाठी टॉक टू स्टारचा ७२०० २२२ ३३३ हा मार्गदर्शक संपर्क क्रमांक असेल, जिथे होम हेल्थकेअर सेवेसाठी १ दाबा आणि नियोजित रुग्णालयात दाखल होण्याच्या मदतीसाठी २ दाबा.

या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत स्टार हेल्थ इन्शुरन्सचे बिझनेस हेड श्री. विजय अरोरा म्हणाले:

“पावसाळ्यात ताप, डेंग्यू, मलेरिया आणि संसर्गजन्य आजार वाढणे स्वाभाविक असते, पण अनेकदा कुटुंबं लक्षणे गंभीर होईपर्यंत वाट पाहतात. या ऋतूत वैद्यकीय मदतीची पहिली पायरी सोपी करणे हाच आमचा प्रयत्न आहे. विमाधारक होम हेल्थकेअर किंवा नियोजित रुग्णालयात दाखल होण्याच्या मार्गदर्शनासाठी टॉक टू स्टारला ७२०० २२२ ३३३ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात, तर सर्वसामान्य जनता मोफत २४/७ व्हर्च्युअल ओपीडी सल्ला बुक करण्यासाठी स्टार हेल्थ अॅपचा वापर करू शकतात. या ऋतूत वेळेवर घेतलेला सल्ला खूप महत्त्वाचा ठरू शकतो.”

कमी खर्च आणि पावसाळ्यासाठी सज्ज केअर: होम हेल्थकेअरचे महत्त्व

२०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसच्या कौटुंबिक आरोग्य खर्चावरील ८०व्या फेरीच्या सर्वेक्षणातील आकडेवारी आजारपण आणि रुग्णालयात दाखल होण्यामुळे कुटुंबांवर पडणारा आर्थिक भार अधोरेखित करते. महाराष्ट्रात खाजगी रुग्णालयात दाखल होण्याचा सरासरी खर्च ग्रामीण भागात ४४,५८० रुपये आणि शहरी भागात ६७,८३१ रुपये आहे, ज्यामध्ये रुग्णालयात दाखल होण्याच्या खर्चाचा जवळपास ९० टक्‍के हिस्सा व्यक्ती आणि कुटुंबांना स्वतःच्या खिशातून सोसावा लागतो.

स्टार हेल्थचा मान्सून सपोर्ट प्रोटोकॉल दोन स्पष्ट मार्ग तयार करून ही तफावत दूर करण्‍याचे काम करतो आणि हे दोन मार्ग आहेत विमाधारकांसाठी टॉक टू स्टार आणि सर्वसामान्य जनतेसाठी स्टार हेल्थ कस्टमर अॅपद्वारे मोफत व्हर्च्युअल ओपीडी. एकत्रितपणे, या सेवा कुटुंबांना लक्षणे गंभीर होण्यापूर्वी किंवा रुग्णालयात जाण्याची वेळ येण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेण्याचा सोपा व जलद मार्ग उपलब्ध करून देतात.

या उपक्रमांतर्गत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तीन अत्यंत महत्त्वाच्या आणि वेळेवर मिळणाऱ्या सेवा एकत्र आणल्या आहेत:

–       विमाधारकांसाठी अमर्यादित टेलिकन्सल्टेशन्स (ऑनलाईन डॉक्टरांचा सल्ला): विमाधारक पॉलिसीच्या कालावधीत अमर्यादित वेळेस ऑनलाईन डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात. यामुळे ताप किंवा संसर्गाचे पहिले लक्षण दिसताच वेळेवर वैद्यकीय सल्ला घेण्यास प्रोत्साहन मिळते.

–       विमाधारकांसाठी टॉक टू स्टार: विमाधारक मार्गदर्शनासाठी आणि मदतीसाठी ७२०० २२२ ३३३ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. होम हेल्थकेअरसाठी १ दाबा आणि नियोजित रुग्णालयात दाखल होण्याच्या मदतीसाठी २ दाबा. ही सेवा ग्राहकांना उपचारांचे पर्याय, कॅशलेस प्रक्रिया, नेटवर्कमधील रुग्णालयांचे पर्याय आणि कोणती कागदपत्रे तयार ठेवायची हे समजून घेण्यास मदत करते.

–       कॅशलेस होम हेल्थकेअर: पात्र विमाधारकांसाठी, ज्यांच्या आजाराचे व्यवस्थापन वैद्यकीय देखरेखीखाली घरीच केले जाऊ शकते, स्टार हेल्थ डॉक्टरांनी लिहून दिलेल्या घरगुती उपचारांचा खर्च उचलते. यामध्ये रुग्णाच्या घरी पुरवली जाणारी व्यावसायिक नर्सिंग सेवा, नियमित रक्त चाचण्या आणि देखरेख, सलाईन आणि इंजेक्शन या सेवांचा समावेश असू शकतो.

सर्वसामान्य जनतेसाठी मोफत व्हर्च्युअल ओपीडी:

बिगर-विमाधारक आणि सर्वसामान्य नागरिक स्टार हेल्थ कस्टमर अॅपच्या माध्यमातून या सेवेचा लाभ घेऊ शकतात, जिथे वापरकर्ते पावसाळ्यातील सामान्य लक्षणांसाठी मोफत २४/७ व्हर्च्युअल ओपीडी सल्ला बुक करू शकतात.

या सेवेचा लाभ घेण्यासाठी वापरकर्ते खालील पायऱ्यांचे अनुसरण करू शकतात:

1.    स्मार्टफोनवर स्टार हेल्थ कस्टमर अॅप डाऊनलोड करा.

2.    उपलब्ध आरोग्य फायद्यांचा लाभ घेण्यासाठी नाव, ईमेल आयडी आणि जन्मतारीख यासारख्या मूलभूत माहितीसह साइन अप (नोंदणी) करा.

3.    अॅपमधील मेनू उघडा आणि ‘टेलीमेडिसिन’ पर्याय निवडा.

4.    संबंधित क्षेत्रातील अनुभवी डॉक्टरांसोबत मोफत ऑनलाईन सल्लामसलत बुक करा.

या मोहिमेचा भाग म्हणून स्टार हेल्थ संपूर्ण राज्यातील कुटुंबांना, विशेषतः शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिक असलेल्या कुटुंबांना पावसाळ्यातील प्राधान्य आरोग्य नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे: सतत येणाऱ्या तापाकडे दुर्लक्ष करू नका, सुरुवातीच्या टप्प्यातच वैद्यकीय सल्ला घ्या आणि मदतीसाठी योग्य मार्ग निवडा. विमाधारक टॉक टू स्टारला ७२०० २२२ ३३३ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात, तर बिगर-विमाधारक स्टार हेल्थ कस्टमर अॅपच्या माध्यमातून मोफत २४/७ व्हर्च्युअल ओपीडी सल्ला बुक करू शकतात.

या पावसाळ्यात राज्यातील कुटुंबांसाठी एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे: सतत येणाऱ्या तापाकडे दुर्लक्ष करता कामा नये आणि डॉक्टरांशी लवकर संपर्क साधल्यास, म्हणजेच विमाधारकांसाठी फोनद्वारे किंवा सर्वसामान्य जनतेसाठी मोफत २४/७ व्हर्च्युअल ओपीडीद्वारे, लक्षणे गंभीर होण्यापूर्वी योग्य पावले उचलण्यास कुटुंबांना मदत होऊ शकते.

Comments are closed.