
जनरल पर्पज इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्ससाठी कॉम्पॅक्ट आणि हाय-परफॉर्मन्स एसी ड्राइव्ह्जची नवीन रेंज
नवीन एएमएक्स सिरीजमध्ये प्रगत फील्ड-ओरिएंटेड कंट्रोल, इन-बिल्ट लोड मॉनिटरिंग आणि मजबूत इंजिनिअरिंगचा मेळ; आव्हानात्मक औद्योगिक वातावरणात अचूक मोटर कंट्रोल देण्यासाठी डिझाइन
नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड (सीजी) या जागतिक इंजिनिअरिंग कंपनी आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने एएमएक्स सिरीज ड्राइव्ह्जच्या लाँचची घोषणा केली आहे. जनरल पर्पज एसी ड्राइव्ह्जची ही नवीन रेंज कंपनीच्या इंडस्ट्रियल ड्राइव्ह्ज आणि ऑटोमेशन सोल्युशन्सच्या पोर्टफोलिओचा अधिक विस्तार करते. इंडक्शन मोटर्स आणि परमनंट मॅग्नेट मोटर्स, दोन्ही नियंत्रित करण्यासाठी डिझाइन केलेली एएमएक्स सिरीज जगभरातील विविध औद्योगिक ॲप्लिकेशन्समध्ये अचूक स्पीड रेग्युलेशन, जलद टॉर्क रिस्पॉन्स आणि विश्वासार्ह कामगिरी देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
“मजबूत आणि बहुउपयोगी ॲप्लिकेशन्ससाठी अत्याधुनिक ड्राइव्ह्ज” अशी संकल्पना असलेली एएमएक्स सिरीज, वापरण्याची सुलभता आणि एकूण मालकी खर्च यांच्याशी तडजोड न करता इंटेलिजंट ड्राइव्ह सोल्युशन्सच्या माध्यमातून उद्योगांना कार्यक्षमता, उत्पादकता आणि ऑपरेशनल रिलायबिलिटी सुधारण्यास सक्षम करण्याची सीजीच्या कटिबद्धतेला निदर्शनास आणते.
एएमएक्स रेंजमध्ये प्रगत व्ही/एफ आणि फील्ड-ओरिएंटेड कंट्रोल (एफओसी) यांचा कॉम्पॅक्ट आणि स्पेस-ऑप्टिमाइज्ड डिझाइनसोबत मेळ घालण्यात आला आहे. यामुळे आव्हानात्मक औद्योगिक परिस्थितीत हाय स्टार्टिंग टॉर्क, अचूक स्पीड रेग्युलेशन आणि सुधारित लो-फ्रिक्वेन्सी परफॉर्मन्स मिळतो. ही सिरीज १.५ केडब्ल्यू ते ५५ केडब्ल्यू पॉवर रेटिंगमध्ये, ३-फेज, २३०व्ही ते ४८०व्ही पर्यायांसह उपलब्ध आहे. एएमएक्स सिरीजचे उत्पादन सीजीच्या मंडीदीप, मध्य प्रदेश येथील सुविधेत करण्यात येते.
एएमएक्स सिरीजच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
• हाय स्टार्टिंग टॉर्क आणि जड भारासह मोटर सुरू करण्याच्या परिस्थितीत विश्वासार्ह कामगिरी.
• मजबूत आणि कॉनफॉर्मली कोटेड डिझाइन, जे कोणत्याही डिरेटिंगशिवाय ५०°सेल्सियस एम्बियंट तापमानात ऑपरेशनसाठी रेटेड आहे आणि उष्ण, दमट तसेच कठीण ऑपरेटिंग परिस्थितींचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
• बिल्ट-इन लोड मॉनिटरिंग, टाइमर्स, काउंटर्स आणि व्हर्च्युअल आय/ओ, बाह्य हार्डवेअरची गरज न पडता लवचिक इन-बिल्ट लॉजिकची सुविधा देतात.
• इन-बिल्ट ऑसिलोस्कोपसह ग्राफिकल यूजर इंटरफेस, ज्यामुळे त्वरित मॉनिटरिंग आणि वेव्हफॉर्म ॲनालिसिसची सुविधा मिळते.
• ४५ केडब्ल्यू पर्यंतचा इन-बिल्ट ब्रेक चॉपर आणि इंटिग्रेटेड व्हेक्टर ब्रेकिंग, जलद, सुरक्षित आणि नियंत्रित स्टॉपची सुविधा देतात.
• इन-बिल्ट एनर्जी-सेव्हिंग फंक्शन, ऑपरेशनची गरज नसताना मोटर आपोआप थांबवते
या लाँचबद्दल बोलताना सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेडचे ग्रुप सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर अमर कौल म्हणाले, “आज उद्योगांना केवळ मोटर चालवण्यापेक्षा अधिक कामगिरी करणाऱ्या ड्राइव्ह्जची गरज आहे. प्लांट टीम्सना कामगिरीचे मॉनिटरिंग करण्यास, डाउनटाइम टाळण्यास आणि ऑपरेशन्स कार्यक्षमपणे सुरू ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या इन-बिल्ट इंटेलिजन्सची त्यांना आवश्यकता आहे. एएमएक्स सिरीज ड्राइव्ह्ज ही क्षमता एका कॉम्पॅक्ट आणि मजबूत पॅकेजमध्ये उपलब्ध करून देतात. आमच्या ग्राहकांसाठी दैनंदिन ऑपरेशन्स अधिक सोपे करणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये सीजी करत असलेल्या गुंतवणुकीचे हे प्रतिबिंब आहे. त्याचबरोबर शॉपफ्लोअरवरील उपकरणांची कार्यक्षमता सुधारण्यास आणि विश्वासार्हता वाढवण्यासही यामुळे मदत होते.”
एएमएक्स सिरीज ड्राइव्ह्जमधील १८.५ केडब्ल्यू पर्यंतचे मॉडेल्स आता सीजीच्या विक्री आणि चॅनेल नेटवर्कद्वारे उपलब्ध आहेत, तर ५५ केडब्ल्यू पर्यंतची रेंज आगामी तिमाहींमध्ये टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जाईल.
Comments are closed.