
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : सिन्नर येथील साहित्यिका, पत्रकार तसेच तरुप्रीत प्रकल्पाच्या संचालिका, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सिन्नरच्या कोषाध्यक्ष व एस.एस.के. कॉलेज नायगांव येथील सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असणाऱ्या विद्यार्थीप्रिय प्रा.डॉ. मंगल कचरू सांगळे यांना शिक्षण, साहित्य, सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल शिवाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२६’ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
गेल्या सात वर्षांपासून तरुप्रीत प्रकल्पाच्या माध्यमातून ओसाड माळरानावर हिरवळ फुलवून २० हजारांहून अधिक बीजारोपण व २५०० हुन अधिक वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचे काम अविरतपणे करणाऱ्या डॉ. मंगल सांगळे ह्या उत्तम कवयित्री व लेखिका असून सातत्याने लिखाण करून मराठी साहित्यात महत्वपूर्ण काम करत आहेत. तसेच त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी पीएच. डी. पदवी संपादन केली आहे. मराठी विषयात सलग पाच वेळा नेट परीक्षा व एकदा सेट परीक्षा उत्तीर्ण होण्याचे रेकॉर्ड देखील त्यांच्या नावावर आहे. त्यांना या सर्व क्षेत्रातील कार्याबद्दल भारतरत्न मदर तेरेसा गोल्ड मेडल अवॉर्ड २०२० हा राष्ट्रीय पुरस्कार व १५ हुन अधिक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
डॉ. मंगल सांगळे यांचे सदर पुरस्काराबद्दल धनलक्ष्मी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा कुसुम कातकाडे, सरचिटणीस डॉ.कुणाल कातकाडे, संचालिका उज्ज्वला कातकाडे, धनलक्ष्मी पतसंस्थेचे संचालक संग्राम कातकाडे यांनी अभिनंदन केले आहे.तसेच विविध स्तरातून डॉ. मंगल सांगळे यांचे अभिनंदन केले जात आहे.
Comments are closed.