- कोरोना घोटाळा प्रकरणी वस्तुनिष्ठ अहवाल न देणे अंगलट
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
कोरोना काळातील घोटाळा प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. पालघरला रिक्त पदावर बदली झालेल्या डॉ. शिंदे यांचा पदभार डॉ. निलेश पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकाराने आरोग्य क्षेत्रात विविध प्रकारच्या चर्चा रंगल्या आहेत.
कोरोन काळात डॉ. अशोक थोरात यांच्या कार्यकाळात रुग्णालय तसेच ऑपरेशन थिएटर उभारणी प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा होती. या काळात खरेदी केलेल्या साधनसामुग्री खरेदीतही घोटाळा झाल्याचे सांगण्यात येते. त्याची दाखल घेत शासनाने डॉ. थोरात यांची बदली केली होती तर तत्कालीन वैध्याकीय अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर डॉ. चारुदत्त शिंदे यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदभार सोपवण्यात आला होता. मात्र, डॉ. शिंदे यांनी कोरोना काळातील घोटाळ्याचा वस्तुनिष्ठ अहवाल सोपवला नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. वरिष्ठ स्तरावरून नेमलेल्या चौकशीने डॉ. शिंदे यांच्यावर ठपका ठेवत त्यांना दोषी ठरवले. त्यानुसार, डॉ. शिंदे यांची बदली झाल्याचे सांगण्यात येते. पालघर जिल्ह्यातील वाणगाव येथील रिक्त जागेवर डॉ. शिंदे यांची वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी डॉ. निलेश पाटील यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे.
Comments are closed.