NGN News
Latest Marathi News

ॲड. मिलिंद चिंधडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : ॲड. प्रा. मिलिंद चिंधडे यांच्या ज्योतिष क्षेत्रातील दीपस्तंभ या पुस्तकाचे प्रकाशन महंत सुधीर दास यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ रसिका गायधनी चिंधडे हिने ईशस्तवन म्हटले. वैशाली प्रकाशनचे श्री विलास पोतदार यांनी प्रकाशनामागची त्यांची भूमिका स्पष्ट केली. लेखक मिलिंद चिंधडे यांनी ह्या पुस्तकात असलेल्या ज्योतिषांचे काम ज्योतिष क्षेत्रात काम करणाऱ्या नवीन लोकांना समजावे या उद्देशाने पुस्तक लिहिल्याचे त्यांच्या मनोगतात सांगितले.

श्री लक्ष्मीकांत जोशी यांनी ज्योतिष क्षेत्रात काय काम झाले आणि काय काम करायचे राहिले आहे याचा आढावा घेतला. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष श्री अनिल चांदवडकर यांनी पुस्तकाचे महत्व विशद केले. श्रीयुत विश्वास साक्रीकर यांनी ज्योतिषाचा अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीने झाला पाहिजे. या शास्त्राला कोणी उपजीविकेचे साधन मानू नये असे सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महंत श्री सुधीरदास यांनी पुस्तकाच्या निमित्ताने पूर्वसूरींनी या क्षेत्रात केलेल्या प्रचंड कामाचा आढावा घेऊन प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाचे महत्व सांगितले.

यानिमित्ताने ज्योतिष क्षेत्रात काम करणाऱ्या नाशिक आणि नाशिक बाहेरील मंडळींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सामाजिक आणि ज्योतिष क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. पसायदान आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ गायत्री बापट यांनी केले.

Comments are closed.