NGN News
Latest Marathi News

महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी आणि उबर यांची भागीदारी

  • भारतभरात इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांच्या वापराला चालना देणार


ईव्ही ऑटो ॲडव्हांटेज कार्यक्रमांतर्गत पुढील 12 महिन्यांत महिंद्राच्या 5000 इलेक्ट्रिक ऑटो सादर करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी चालकांना वित्तपुरवठा अधिक सुलभ करून आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या स्वीकारातील अडथळे दूर करून सहाय्य केले
जाणार आहे
.

एमएलएमएमएल (महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी लिमिटेड) ही 2026 च्या प्रतिष्ठेच्या अर्थशॉट पुरस्काराच्या ‘क्लिन अवर एअर’ श्रेणीतील अंतिम फेरीतील निवडक कंपन्यांपैकी एक आहे.

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क

भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी लिमिटेड (एमएलएमएमएल) आणि उबर यांनी आज भागीदारीची घोषणा केली. या भागीदारीच्या माध्यमातून पुढील 12 महिन्यांत महिंद्राच्या 5000 इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांच्या वापराला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या सामंजस्य करारानुसार (MoU) दोन्ही कंपन्या ईव्ही ऑटो ॲडव्हांटेज
कार्यक्रमांतर्गत सहकार्य करणार आहेत. या माध्यमातून वित्तपुरवठा अधिक सुलभ करणे आणि इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर सुविधा उपलब्ध करून देणे यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे उबर प्लॅटफॉर्मवर कार्यरत असलेल्या चालकांना
इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे वळणे अधिक सोपे होणार आहे. विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अद्याप कमी असलेल्या बाजारपेठांवर या भागीदारीत लक्ष केंद्रित केले जाणार असून या वाहनांचा अवलंब करण्यामधील प्रमुख अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी आणि उबर यांच्या भागीदारीची घोषणा मुंबईत आयोजित कार्यक्रमात करण्यात आली. त्यातून भारतीय शहरांसाठी शाश्वत आणि सर्वांना सहज उपलब्ध होणाऱ्या दळणवळण उपायसुविधांना प्रोत्साहन देण्याची त्यांची सामायिक बांधिलकी ठळकपणे दिसून आली.

या भागीदारीविषयी बोलताना, महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन मिश्रा म्हणाल्या, “सर्वप्रथम चालकांच्या गरज आणि हिताला प्राधान्य दिले गेले तरच शाश्वत दळणवळण विस्तार मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. चालक आणि उद्योजकांसाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी हा अधिक फायदेशीर आर्थिक पर्याय निर्माण करून आम्ही शाश्वत आणि व्यापक स्तरावर विस्तारता येईल असा सकारात्मक बदल घडवत आहोत. उबरसोबतच्या या भागीदारीच्या माध्यमातून इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे होणाऱ्या बदलाला अधिक गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विशेषतः भारतातील ज्या भागांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार अद्याप कमी आहे, तेथे या परिवर्तनाला चालना देण्यावर आमचा विशेष भर असेल.”
 
कार्यक्रमात बोलताना उबरचे मोबिलिटी विभागाचे प्रमुख प्रदीप परमेश्वरन म्हणाले, “उबरसाठी भारत हा मोबिलिटी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा एक महत्त्वाचा स्रोत राहिला आहे. लोक प्रवास कसा करतात, त्यांच्या दैनंदिन गरजा काय आहेत, हे समजून घेऊन त्यानुसार
उपाययोजना विकसित करण्यातच शहरी मोबिलिटीचे भविष्य सामावलेले आहे यावर आमचा नेहमीच विश्वास राहिला आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटीचा स्वीकार करणे ही केवळ योग्य गोष्ट नाही, तर त्यातून आमच्या व्यवसायाला, वापरकर्त्यांना, शहरांना आणि व्यापक समुदायांना
थेट तसेच धोरणात्मक फायदे मिळतात. इलेक्ट्रिक दळणवळणाला चालना देण्यासाठी महिंद्रासोबत केलेली आमची भागीदारी आणि कनेक्टेड जर्नीज हे याच विचारसरणीचे प्रतिबिंब आहे. सार्वजनिक वाहतूक आणि सामायिक मोबिलिटी सेवा यांचा एकत्रितपणे प्रभावी वापर करून शहरांना अधिक सुलभ, कार्यक्षम आणि शाश्वत बनवणारी दळणवळण परिसंस्था उभारण्याची संधी आपल्यासमोर आहे.”

भारतातील लास्ट माइल वाहतुकीच्या विद्युतीकरणामध्ये एमएलएमएमएल आघाडीवर असून कंपनीची 4 लाखांहून अधिक व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहने सध्या रस्त्यांवर धावत आहेत. प्रवासी वाहतूक तसेच मालवाहतूक या दोन्ही व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रांमध्ये कंपनीचे
भक्कम स्थान आहे. व्यावसायिक वाहनांच्या सर्वाधिक व्यापक श्रेणींपैकी एक असलेल्या पोर्टफोलिओच्या बळावर एमएलएमएमएल लास्ट माइल वाहतुकीच्या विद्युतीकरणाला सातत्याने चालना देत आहे. त्याचबरोबर शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यासाठीही कंपनी प्रयत्नशील आहे. या क्षेत्रातील योगदानाची दखल घेत एमएलएमएमएलची प्रतिष्ठेच्या अर्थशॉट पुरस्कार 2026 च्या ‘क्लिन अवर एअर’ या श्रेणीतील अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.

Comments are closed.